एक्स्प्लोर
मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात 11 पोर्टेबल सिग्नल दाखल
मुंबई : मुंबईतील वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात 11 पोर्टेबल सिग्नल दाखल झाले आहेत. हे सिग्नल एका जागेवरून दुसऱ्या जागी सहजपणे हलविण्यात येतात.
मेट्रोची सुरु असलेली कामं, वाहनांची गर्दी शिवाय या महिन्यानंतर येणारा पावसाळा, यामुळे मुंबईत अनेक रस्ते जाम होतात. अशावेळी हे पोर्टेबल सिग्नल वाहतूक पोलिसांसाठी मदतीचे ठरणार आहे.
मुंबईतल्या रस्त्यांचं जाळं काही हजार किलोमीटर इतकं असलं तरी 1200 इतकेच सिग्नल मुंबईत अस्तित्वात आहेत. त्यामुळे आता हे 11 पोर्टेबल ट्राफिक सिग्नल मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाले आहेत.
मुंबईआधी अशाप्रकारच्या पोर्टेबल सिग्नलचा वापर चेन्नई शहरात करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement