एक्स्प्लोर

शतकपूर्ती करणाऱ्या आजोबांची कोरोनावर मात, वाढदिवस साजरा करत डिस्चार्ज

आज 15 जुलैला 101 व्‍या वर्षात पदार्पण करत असलेल्‍या आजोबांना काल रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्‍यात आला, तो त्‍यांचा शतकपूर्तीचा वाढदिवस साजरा करतच.

मुंबई: जोगेश्‍वरी पूर्व परिसरातील महापालिकेच्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्‍णालयात अर्जुन गोविंद नारिंग्रेकर या शतकपूर्ती करणाऱ्या आजोबांनी कोरोनाशी यशस्‍वी लढा दिला.  नारिंग्रेकर आजोबांचा जन्‍म 15 जुलै 1920 रोजीचा. शतकपूर्ती होण्‍याच्‍या उंबरठ्यावर असतानाच आजोबांना कोरोनाने गाठले आणि‍ घरच्‍या सगळ्याच मंडळींच्‍या काळजाचा ठोका चुकला. आजोबांचा ‘पॉझिटिव्‍ह रिपोर्ट’ आल्‍यानंतर लगेचच 1 जुलै रोजी आजोबा महापालिकेच्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्‍णालयात दाखल झाले. आजोबांचे वय लक्षात घेता, रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी व कर्मचाऱ्यांनी आजोबांची व्‍यवस्थित काळजी घेतली. तर पूर्वाश्रमीचे शिक्षक असणाऱ्या आजोबांनी देखील उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. आज 15 जुलैला 101 व्‍या वर्षात पदार्पण करत असलेल्‍या आजोबांना काल रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्‍यात आला, तो त्‍यांचा शतकपूर्तीचा वाढदिवस साजरा करतच.  तर, कोरोनावर मात करणाऱ्या आजोबांनीही आपल्‍या खणखणीत आवाजात डॉक्‍टरांचे आणि कर्मचारऱ्यांचे आभार मानत कांदिवलीतील आपल्‍या घराकडे कूच केली. अर्जुन गोविंद नारिंग्रेकर हे मूळचे सिंधूदुर्ग जिल्‍हा होण्‍यापूर्वीच्‍या देवगड तालुक्‍यातील नारिंग्रे गावचे रहिवाशी.  नारिंग्रेकर आजोबांनी मिठबांव, दहिबांव, विजयदुर्ग, कोळोशी, नारिंग्रे अशा विविध गावातील जिल्‍हा परिषद शाळांमध्‍ये शिक्षक म्‍हणून काम केले. 31 जुलै 1978 रोजी मुख्‍याध्‍यापक म्‍हणून निवृत्त झालेल्‍या आजोबांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात कार्यरत आहेत. तर, सध्‍या आजोबा आपल्‍या मुलाकडे कांदिवली परिसरात राहतात. आजोबांच्‍या घरातील काही व्‍यक्तिंना कोरोनाची बाधा झाली आणि त्‍यानंतर आजोबांनाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दवाखान्‍यात दाखल झाल्‍यानंतर आजोबांना न्‍युमोनिया देखील असल्‍याचे लक्षात आले आणि मग अतिदक्षता विभागात आजोबांवर उपचार सुरु झाले. मुळातच शिक्षक असणाऱ्या आजोबांचा खणखणीत आवाज आणि कडक शिस्तीचा अनुभव रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी आणि कर्मचारऱ्यांनीही घेतला. जेवणाच्‍या आणि औषधाच्‍या वेळा काटेकोरपणे पाळणाऱ्या आणि डॉक्‍टरांच्‍या सूचना लक्षपूर्वक ऐकून अंमलात आणणाऱ्या आजोबांची कोरोनाशी सुरु असलेल्‍या लढ्यात सरशी झाली. आज आजोबांना डिस्‍चार्ज देण्‍यात आला तेव्‍हा रुग्‍णालयातील कर्मचाऱ्यांनी आवर्जून केक आणून आजोबांचा शतकपूर्तीचा वाढदिवस साजरा करत आजोबांचे आशिर्वाद घेतले. तर नारिंग्रेकर आजोबांनीही रुग्‍णालयातील सर्वच डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांचे भरभरुन आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget