एक्स्प्लोर

Mumbai Local Train:  लोकलवर दगडफेक करण्याआधी दहावेळा विचार करा! हायकोर्टाने आरोपीला सुनावली कठोर शिक्षा

Mumbai Local Train: मुंबई लोकलवर दगडफेक करून प्रवाशांना जखमी केल्याप्रकरणी एका आरोपीला हायकोर्टाने कठोर शिक्षा सुनावली आहे.

Mumbai Local Train:  मुंबईतील लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक आणि लोखंडी सळई फेकून हल्ला करणाऱ्या एका 40 वर्षीय आरोपीला मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवत एकाच प्रकारच्या चार गुन्ह्यामध्ये प्रत्येकी 10 वर्षांच्या सश्रम कारावसाची शिक्षा सुनावली आहे. आपल्या या कृतीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येईल, याची आरोपीला पूर्ण कल्पना होती. मात्र तरीही त्यानं लोकलवर दगडफेक आणि लोखंडी सळई फेकून मारण्यासारखं कृत्य केलंय. अशा समाजकंटकांना शिक्षा ठोठावून समाजात योग्य तो संदेश पोहोचवणं गरजेचं आहे, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर यांनी आपल्या निकालात नोंदवत हत्येच्या आरोपाखाली आरोपीला ही शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे प्रकरण

कुर्ला आणि विद्यविहार स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलवर 40 वर्षीय राकेश रॉडनं 16 जुलै 2019 रोजी एकच दिवशी तीनदा दगडफेक केली होती. त्यामध्ये कुर्ला ते विद्याविहार दरम्यान दुपारी प्रवास करणारे रतनदीप चंदनशिवे प्रथम लक्ष्य झाले. ज्यात त्यांच्या डाव्या कोपराला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर टिटवाळास्थित अजय कहार (23) हा तरूण गोवंडीहून कुर्लामार्गे घरी परतत असताना राकेशनं केलेल्या दगडफेकीमुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. तर 32 वर्षीय तौसिफ खान हा सायंकाळी पनवेलच्या दिशेनं प्रवास करत असताना राकेशनं अचानक फेकलेल्या सळईचा मार थेट त्याच्या पोटात बसला होता. या घटनेत जखमी झालेल्या दोघांच्या डोक्याला टाके घालावे लागले होते. याशिवाय एका विद्यार्थ्यानं या हल्ल्यात स्मरणशक्ती गमावल्याचीही माहिती आहे. या हल्ल्यांनतर राकेश रॉडला लगेचच अटक करण्यात आली, तेव्हापासून तो कारागृहातच आहे.

कोर्टाचं निरीक्षण

तिथल्या कचरा वेचणाऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात ही दगडफेक केल्याचा आरोपीचा बचाव न्यायालयानं साफ फेटाळून लावला. आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचंही आरोपीनं एकदा कोर्टात सांगितले होतं. मात्र, वैद्यकीय चाचण्यांवरून त्याच्या मानसिकतेत कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. आरोपी हा कुटुंबासाठी एकटा कमावणारा असल्याची बाब वगळता त्याला शिक्षेत दया दाखवावी असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही किंबहुना त्यानं केलेला गुन्हा समाजाच्यादृष्टीनं धोकादायक आहे. तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवाय आरोपीच्या कृत्यामुळे जखमी झालेल्यांचे जीवन आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे. 

तर दुसरीकडे, रेल्वे ही सार्वजनिक मालमत्ता असल्यानं जनतेनंच त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. समाजातील अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणं आवश्यक असल्याचं नमूद करत मुंबई सत्र न्यायालयानं रेल्वे कायद्याच्या कलम 152 (रेल्वेने प्रवास करणार्‍यांना दुखापत किंवा इजा करणे) अंतर्गत देखील आरोपीला दोषी ठरवून 10 वर्षांच्या सश्रम कारावसाची शिक्षा ठोठावली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Embed widget