एक्स्प्लोर
अवघ्या दहा वर्षाच्या मुलाकडून मेव्हण्याची हत्या
![अवघ्या दहा वर्षाच्या मुलाकडून मेव्हण्याची हत्या 10 Year Old Boy Murdered His Sister Husband अवघ्या दहा वर्षाच्या मुलाकडून मेव्हण्याची हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/23075326/vasai-murder-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वसई: वसईमध्ये अवघ्या दहा वर्षाच्या लहानग्यानं आपल्या सख्या मेव्हण्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या बहिणीला मारत असताना प्रतिकार करण्यास गेलेल्या या चिमुरडयानं घरातील चाकूने त्याच्यावर वार केला आणि नेमका तो वार त्याच्या वर्मी बसला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
सागर मनोहर उमरखाने असं या ३५ वर्षीय मयत इसमाच नाव आहे. तो पत्नी लता आणि चार मुलांबरोबर गुजरातमध्ये राहत होता. सागरच्या दारू पिऊन मारहाणीच्या स्वभावाला वैतागून, लता आपल्या माहेरी वसईच्या वाघरी पाडा येथे आपल्या वडीलांकडे आली होती.
रविवारी दुपारी ती घरी असताना, दारूच्या नशेत सागर तेथे आला आणि लताला मारहाण करु लागला. त्याला प्रतिकार करण्यासाठी लताचा दहा वर्षाचा भाऊ समोर आला. त्यालाही सागरने गळा दाबून मारण्यास सुरूवात केली. त्याचवेळी लताच्या भावाने भांडयातील चाकू घेतला आणि सागरच्या छातीवर आघात केला. तोच एक घाव सागरच्या वर्मी बसला. सागर रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, अल्पवयीन मुलाला सध्या ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)