एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एलईडी टीव्हीतून सोन्याची तस्करी, मुंबई विमानतळावर एक किलो सोनं जप्त
मुंबई : मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं एक किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. अबु धाबीवरुन आलेल्या एका प्रवाशाकडे हे सोनं सापडलं आहे. काल मुंबई विमानतळावर पकडलेल्या या सोन्याची किंमत जवळपास 32 लाख आहे.
काल मुंबईत अवैधरित्या सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कस्टमनं अंबाल्लाकुन्नुमल रमीस नावाच्या प्रवाशाला ताब्यात घेतलं. मुंबईतून हा प्रवासी कोझीकोडला रवाना होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.
अबु धाबीवरुन आलेल्या या प्रवाशानं 32 इंची एलईडी टीव्हीमध्ये सोनं लपवून आणलं होतं. स्कॅनिंगवेळी कस्टम विभागाला एलईडी टीव्हीत लपवून आणलेले काळ्या रंगानं रंगवलेले दोन सोन्याचे तुकडे सापडले. या सोन्याचं वजन 1194 ग्रॅम्स तर त्याची अंदाजे किंमत 31,68,780 रुपये इतकी आहे. कस्टमनं सोनं जप्त करुन तस्करीप्रकरणी या प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement