एक्स्प्लोर

मोठी बातमी! मुंबई पोलीस दलातील शिपाईंचा सैन्यातील जवानांप्रमाणे होणार सन्मान; मुंबई पोलीस आयुक्तांचा आदेश जारी

Mumbai News : मुंबई पोलीस दलासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सैन्यामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो. हीच प्रथा आता मुंबई पोलीस (Police) दलात सुरू केली जाणार आहे.

Mumbai News : मुंबई पोलीस दलासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सैन्यामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो. हीच प्रथा आता मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात सुरू केली जाणार आहे. तसेच मुंबई पोलीस (Police) दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी, अंमलदारांचा बँड पथकाच्या संचलनाद्वारे(पिपिंग सेरेमनी) सन्मान करा, असा आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना दिला आहे. पदोन्न्ती ही केवळ पदवाढ नसून त्यामागे संबंधित अधिकारी, अंमलदारांची अनेक वर्षांची निष्ठा, मेहनत दडलेली असते. पदोन्नती म्हणजे कर्तव्यादरम्यान पार पाडलेली जबाबदारी, कर्तृत्व व समर्पणाला मिळालेली मान्यता असते, असे ही त्यात नमूद केले आहे. त्यामुळे पदोन्नती हा निव्वळ प्रशासकीय सोपस्कार न राहता प्रेरणास्रोत व्हावा, हा उद्देश असल्याचेही देवेन भारती यांनी पत्रात म्हटले आहे. 

पोलिसांच्या पदोन्नतीचे आदेश जारी होताच त्यानंतर येणाऱ्या 1 तारखेला त्यांचा सन्मान केला जावा, असे निर्देश भारती यांनी दिले आहे. मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त हे पदोन्नतीप्राप्त अंमलदारांचा तर पोलिस सहआयुक्त हे उपनिरीक्षक ते सहायक आयुक्तपर्यंत दर्जाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करतील. यात अंमलदार असो वा अधिकारी पदोन्नती मिळाल्यावर त्यांचे मनोबल वाढावे, केवळ प्रशासकीय बाब नाही तर काम करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

निवृत्त पोलीस अधिकारी शारदा प्रसाद यादव यांचे निधन

दरम्यान पोलीस दलातून एक दु:खद  बातमी समोर आली आहे. निवृत्त पोलीस अधिकारी शारदा प्रसाद यादव यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर माहीम येथील हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गोरेगाव पूर्व येथील आरे परिसरातील शिवधाम स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा खासगी विमान कंपनीत वैमानिक पदावर कार्यरत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

नागपूर पोलीस आयुक्त पदाची कारकिर्द राहिली चर्चेत 

यादव भारतीय पोलीस सेवेच्या 1986च्या तुकडीचे अधिकारी होते. यादव यांची नागपूर पोलीस आयुक्त पदाची कारकिर्द चर्चेत राहिली. यावेळी त्यांनी पोलीस व नागरिकांमधील संबंध मैत्रीपूर्ण करण्याकडे भर दिला होता. त्याचा परिणाम गुन्हे रोखण्यासाठीही झाला होता. गुंड आणि गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा(मोक्का) अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारी मोडीत काढली. त्या काळात त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व्हाट्सअॅप ग्रुप, फेसबुक आणि ट्विटरवर अकाउंट सुरू करण्यास प्रोत्साहित केले. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या व्हाट्सअॅप ग्रुपमुळे जनतेशी चांगले संबंध राखण्यास मदत झाली. राज्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) पदावरही कार्यरत होते. तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अतिरिक्त महासंचालक पदीही ते कार्यरत होते.

हे ही वाचा 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs DC Live Score : अभिषेकचा 'स्वॅग' की राहुलचा 'थाट', आज कोण कोणावर भारी पडणार?, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
SRH vs DC Live Updates IPL 2026 : अभिषेकचा 'स्वॅग' की राहुलचा 'थाट', आज कोण कोणावर भारी पडणार?, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
तुमचा आणि आझादीच्या लढ्याचा संबंध काय? तुमची जिंकायची औकात नाही म्हणून ED, CBI घुसवताय; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
तुमचा आणि आझादीच्या लढ्याचा संबंध काय? तुमची जिंकायची औकात नाही म्हणून ED, CBI घुसवताय; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
Namita Thapar: नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
Latur News: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; उन्हात राबताना शरीरातील पाण्याची पातळी घटली
लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; उन्हात राबताना शरीरातील पाण्याची पातळी घटली

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
Embed widget