Mumbai Local Train: मुंबईत ट्रेनचा मोठा अपघात टळला; लोकल ट्रेनची काँक्रिटच्या फाऊलिंग मार्कला धडक, अनेक चर्चेला उधाण
Mumbai Local Train : मुंबईतील मध्य रेल्वेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) मोठ्या अपघाताचा अनर्थ टळला आहे.

Mumbai Local Train : मुंबईतील मध्य रेल्वेसंदर्भात (Central Railway) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) मोठ्या अपघाताचा अनर्थ टळला आहे. यात ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान कल्याणकडे जाणारी एक लोकल ट्रेन काँक्रीटच्या फाउलिंगच्या मार्कला धडकली (Accident). कालच्या (14 मे 2025) रात्री ही घटना घडली असून वेळीच प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला आहे.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल, 14 मेच्या रात्री 10.30 च्या सुमारास, ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान कल्याणकडे जाणारी एक लोकल ट्रेन काँक्रीटच्या फाउलिंगच्या मार्कला जाऊन अचानक धडकली. दरम्यान या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली असता, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, एएससी(ASC) ठाणे यांच्यासह इतर आरपीएफ, अभियांत्रिकी आणि ऑपरेटिंग कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
समाजकंटकांच्या कारवायांमुळे घडली घटना?
दरम्यान, या घटनेबाबत सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आरपीएफला असे वाटते आहे की ही घटना समाजकंटकांच्या कारवायांमुळे घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे अतिक्रमण रोखण्यासाठी रेल्वेने नवीन सीमा भिंत बांधली आहे. हे ते ठिकाण आहे जिथे गोपाळनगर (रेल्वे ट्रॅकच्या मधोमध वसलेली वस्ती असून येथील लोकांनी सीमा भिंतीच्या बांधकामाला विरोध केला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते की, एफओबी (फूट ओव्हर ब्रिज)ची व्यवस्था होईपर्यंत सीमा भिंत बांधू नये. या प्रकरणी रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे कृत्य नेमकं कुणी केलं की या मागे अजून काही कारण आहे? याचा तपास आता रेल्वे पोलीस करत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास सिटी लिंक बस चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने बस उडान पुलाच्या भिंतीवर जाऊन धडकली. यात बस चालक गंभीर जखमी झाला असून मयूर निकम (वय 28) असं बस चालकाचे नाव आहे. CNG गॅस भरून तपोवन डेपोत गाडी घेऊन जात असतांना हा अपघात झाला आहे. तर सुदैवाने बसमध्ये प्रवाशी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
हे ही वाचा
























