Mumbai Drugs Case: आर्यन खानसोबतच्या सेल्फीमधील ती व्यक्ती कोण? NCBनं दिली माहिती
क्रूज ड्रग्स पार्टीमध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव समोर आले आहे. सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप व्हारयल झाला. या फोटोमध्ये एक व्यक्ती आर्यन खानसोबत सेल्फी घेताना दिसत आहे.
Mumbai Drugs Case: क्रुझ ड्रग्स पार्टीमध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव समोर आले आहे. तीन जणांसोबत आर्यनला एक दिवसासाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने ताब्यात घेतले. यासर्व घडामोडींमध्ये आता सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला. या फोटोमध्ये एक व्यक्ती आर्यन खानसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. नुकताच व्हायरल झालेल्या या फोटोबद्दल NCB ने माहिती दिली आहे. NCB ने सांगितले की, आर्यनसोबतच्या सेल्फीमधील व्यक्ती हा एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नाही.
मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छाप्यानंतर ताब्यात घेतलेल्या आठपैकी तीन जणांना एनसीबीने अटक केली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली. एनसीबीकडून या तिघांना जेजे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती एनसीबीच्या सुत्रांनी दिली.
Drugs Case : आर्यन खानची रात्र NCBच्या कोठडीत, आज जामीन अर्जावर सुनावणी
आर्यन सोबतचा हा फोटो कसा घेण्यात आला तसेच हा व्यक्ती कोण आहे? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण हा फोटो सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल झाला. सोशल मीडियावर या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तो व्यक्ती एनसीबीचा कर्मचारी असल्याचा अंदाज बांधला होता. त्यामुळे तपास यंत्रणेने अधिकृतपणे त्या व्यक्तीबद्दल स्पष्टीकरण देत तो व्यक्ती एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तिघांना घेतले ताब्यात
आर्यन खान, अरबाज सेठ मर्चेंट आणि मुनमुन धमेचाला ताब्यात घेतले असून त्यांना एनसीबीची कोठडी सुनावण्यात आली. आर्यन खानचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की,आर्यन खानला क्रूझवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी आमंत्रित केले होते.
Narcotics Control Bureau (NCB) categorically clarifies that the man in this picture with Aryan Khan is not an officer or employee of NCB pic.twitter.com/jGqjWMTvsi
— ANI (@ANI) October 3, 2021
कस्टोडियल अर्जात एनसीबीने म्हटले आहे की, "एनसीबीने केलेल्या प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की व्हॉट्सअॅप चॅटच्या स्वरूपात गुन्ह्यात सहभाग दर्शवणारे साहित्य आहे, यात स्पष्ट झाले आहे की, अटक केलेले आरोपी (आर्यन खान आणि इतर दोन) ड्रग्ज पुरवठादार आणि तस्करांशी त्यांचे नियमित संबंध होते.आर्यन खानच्या विरोधात एनडीपीएस कलम-27 (मादक पदार्थांचे सेवन करणे), 8-सी (मादक पदार्थांचे उत्पादन,मादक पदार्थ ठेवणे, खरेदी करणे किंवा विकणे) अशा अन्य निगडीत कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.