एक्स्प्लोर

मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंनी खरेदी केले मातीचे मावळे

खासदार कोल्हे काही मिनिटंचं कुंभारवाड्यात गेले पण तेवढ्या वेळेत, त्यांचं लहानपण त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्या आठवणींना लागलीच त्यांनी फेसबुकवर मोकळी वाट करून दिली.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं शिवप्रेम हे सर्वश्रुत आहेच. त्याचीच परिणीती आज पुन्हा एकदा आली. निमित्त होतं, पुण्याच्या कुंभारवाड्यात मातीचे मावळे खरेदी करण्याचं. दस्तुरखुद्द अमोल कोल्हे स्वतः मावळे खरेदी करण्यासाठी बाजारात गेले. नारायणगाव येथील घरी खासदारांचा मुलगा, मुलगी आणि पुतण्याने किल्ला साकारलाय. या तिघांनी मातीचे मावळे आणायचा हट्ट धरला होता. खासदारांनी तो पूर्ण केल्याने आज घरच्या किल्ल्यावर हे मावळे विराजमान होणार आहेत. हे मावळे खरेदी करताना खासदारांना त्यांच्या लहानपणींचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि त्या आठवणींना त्यांनी फेसबुकवर मोकळी वाट करून दिली.

खासदार कोल्हे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेकांच्या भेटी घेऊन, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घरातून बाहेर पडत होते. तेव्हा मुलगी आद्या, मुलगा रुद्र आणि पुतण्या अद्वैतने किल्ल्यावर आज मावळे विराजमान व्हायला हवेतच, असा हट्ट धरला. घरी येताना आमच्या किल्ल्यासाठी मावळे घेऊन या, असा जणू आदेशच या तिघांनी खासदारांना केला. खासदारांनी देखील तिघांची मागणी पूर्ण होईल असं आश्वासन दिलं आणि ते घरातून बाहेर पडले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मान्यवरांच्या भेटी घेऊन, दिवाळीच्या शुभेच्छा देताना खासदारांना 'ते' आश्वासन विसरून चालणार नव्हतं. त्यामुळेच ते पुण्यात गेले तेंव्हा त्यांची गाडी थेट कुंभारवाड्यात गेली. तिथं दस्तुरखुद्द कोल्हे गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी मातीचे मावळे खरेदी केली. खासदारांना पाहून बाजरात अनेकांनी गर्दी केली, नेहमीप्रमाणे सेल्फी आणि फोटो निघाले. अन् तिथून पुढचा प्रवास सुरु झाला. खासदार कोल्हे काही मिनिटंचं कुंभारवाड्यात गेले पण तेवढ्या वेळेत, त्यांचं लहानपण त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्या आठवणींना लागलीच त्यांनी फेसबुकवर मोकळी वाट करून दिली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट

लहानपणी दिवाळसणात एक आणखी सोहळा असायचा तो किल्ला बनवण्याचा! दगड माती आणून घराच्या अंगणात किल्ला बनवायचा आणि किल्ला छान झाला की मातीची चित्र आणून देणार असं आई वडिलांचे म्हणणं असायचं. अगदी किल्ले प्रदर्शनात असतात तसा देखणा किल्ला नाही बनवता आला कधी परंतु "छान झालाय. चला मावळे घेऊन येऊ " अशी आईवडलांची शाबासकी नक्की मिळायची. कदाचित एक 'शिवसंस्कार ' बालमनात रुजतो आहे त्याला प्रोत्साहन असावं... आणि एकदा किल्ल्यावर आले की मग ते मावळे दिवाळी पुरते उरायचे नाहीत... वर्षभराचे सवंगडी व्हायचे.. अगदी एखादं चित्र तुटलं तर भाताच्या शिताने त्याचं ऑपेरेशन करण्यापासून ते पुन्हा रंगरंगोटी करण्यापर्यंत. पण दर वर्षी त्या संख्येत भर पडली पाहिजे हा हट्ट मात्र कायम असे. आज माझ्या मुलांनी बनवलेल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी मातीची चित्र घेत फिरताना अनेक बालगोपाळ भेटले, पालक भेटले.. किती वर्ष उलटली तरी तोच उत्साह, तीच भावना.. चित्रांचाही चेहरामोहरा बदलतोय.. कुठे बारा बलुतेदार, कुठे संभाजी महाराज तर कुठे फायबरचे वाटावेत एवढे सुबक खरे कपडे चढवलेले मावळे... नकळत मन बालपणात फेरफटका मारून आलं... परतल्यावर समाधान कायम होतं... शिवसंस्कार अजूनही रुजतो आहे...वाढतो आहे...अंगणात, सोसायटीत बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक किल्ल्यासरशी एक बुरुज बांधला जातो आहे... शिवसंस्काराचा!

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 November 2026: आजचा बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना सक्त आदेश, तटकरेंची माहिती, तर रोहित पवारांवरही टीका 
शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना सक्त आदेश, तटकरेंची माहिती, तर रोहित पवारांवरही टीका 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget