एक्स्प्लोर

Bangladesh : बांगलादेशात डासांची दहशत! डेंग्यू झाला जीवघेणा, एका दिवसात सर्वाधिक लोक रुग्णालयात दाखल

बांगलादेशात डेंग्यू जीवघेणा झाला असून या संसर्गामुळे मृतांची संख्या 176 वर पोहोचली आहे.

Bangladesh Dengue Outbreak : बांगलादेशात डेंग्यूने (Dengue) साथीचे रूप धारण केले आहे. बांगलादेशातील रविवारी सकाळपर्यंत एकूण 2,292 डेंग्यू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. केवळ एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रूग्णांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत डेंग्यूने आणखी नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, या संसर्गामुळे मृतांची संख्या 176 झाली आहे. तर बुधवारी या आजाराने 19 लोक मरण पावले होते. ही भयानक परिस्थिती पाहून आरोग्य तज्ञांनी सांगितले की, सरकारने (Government) अधिकृत घोषणा केलेली नसली तरी देखील हा रोग बांगलादेशात "महामारी" सारखा पसरला आहे.

नवीन रुग्णांपैकी 1,064 रुग्णांना स्थानिक रुग्णालयांमध्ये आणि उर्वरित रुग्णांना बाहेरील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संपूर्ण बांगलादेशात, 7,175 डेंग्यू रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, ज्यात राजधानीतील 4,149 रुग्णांचा समावेश आहे. या वर्षी आतापर्यंत, DGHS मध्ये 32,977 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे आणि 25,626 बरे झाले आहेत.

21 दिवसांत 109 मृत्यू

देशात 2022 मध्ये डेंग्यूमुळे 281 मृत्यू झाले होते. जे 2019 मध्ये नोंदवलेल्या मृत लोकांपेक्षा जास्त प्रमाणात आहेत. याशिवाय गतवर्षी डेंग्यूचे 62423 रुग्ण सापडले होते आणि 61971 बरे झाले होते. गेल्या 21 दिवसांत 109 मृत्यू आणि 20465 पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद झाल्यामुळे जुलै हा बांगलादेशकरता सर्वात भयावह महिना ठरला आहे. एका आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, जानेवारीमध्ये डेंग्यूचे 566 रुग्ण आढळून आले असून त्यातपैकी सहा जणांचे मृत्यू झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये शून्य मृत्यूसह 111 प्रकरणे समोर आली होती तर मार्चमध्ये दोन मृत्यूंसह 143 प्रकरणे आणि एप्रिलमध्ये दोन मृत्यूंसह 50 प्रकरणे, मे महिन्यात 1036 रूग्ण पाॅझिटीव्ह सापडले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यु झाला होता. जूनमध्ये 34 जणांचे मृत्यु होऊन 5,956 प्रकरणे नोंदवली गेली होती.

DGHS डेटानुसार, डेंग्यू पॉझिटिव्ह प्रकरणे आणि मृत्यूच्या आकडेवारीच्या तुलनेत गेल्या वर्षी डेंग्युग्रस्त रूग्णांची संख्या कमी होती. या दरम्यान 268 रुग्णांचा मृत्यू झाला असून 62,382 रुग्णांची नोंद झाली आहे.  2019 मध्ये देशात सर्वाधिक 1,01,354 डेंग्यूचे रुग्ण आणि 179 मृत्यू झाले. एडिस डासांच्या उत्पत्तीसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने अधिक चांगले असतात.यामुळे रुग्णांच्या संख्येत तीव्र वाढ होण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी (Health Expert) व्यक्त केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Manipur violence: मणिपूर येथे महिलांवरील अत्याचार प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget