Monsoon Recipe : पाऊस.. गरमागरम समोसा म्हणजे स्वर्गसुखच! आता मैद्याशिवायही हेल्दी समोसे खाता येईल, झटपट रेसिपी जाणून घ्या
Monsoon Recipe : समोसा हा भारतीय स्नॅक्सचा सर्वात लोकप्रिय आणि आवडता पर्याय आहे, आज आपण मैद्याशिवाय चविष्ट अन् हेल्दी समोसे बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. .
Monsoon Recipe : बाहेर पाऊस... गॅसवर गरमागरम समोसे तळले जातायत..काय मस्त नजारा आहे हा...! पावसात गरम समोस्यांचा आस्वाद घेणे एखाद्या स्वर्गसुखापेक्षा कमी नाही.. नाही का..? संध्याकाळच्या चहासोबत समोसे खाण्यात मजा येते. समोसा हा भारतीय स्नॅक्सचा सर्वात लोकप्रिय आणि आवडता पर्याय आहे, पण त्यात मैदा आणि तळलेला पदार्थ असल्याने अनेकजणं तो खाणे टाळतात, म्हणून आज आपण मैद्याशिवाय चविष्ट समोसे बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल फर्स्ट क्लास!
पावसात समोसे आणि भजी खायला मजा येते. जसजशी संध्याकाळ जवळ येते तसतसे डोळे चहा आणि सोबत चटपटीत नाश्ता शोधू लागतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहोत जी पावसाळ्यासाठी अतिशय मजेदार पर्याय आहे. हा असा समोसा आहे, जो बनवायला खूप सोपा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तो आवडेल. तुम्ही ते घरी पाहुण्यांसाठी स्नॅक म्हणूनही देऊ शकता. किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे मिनी समोसेही एअर फ्राय करू शकता.
मैद्याशिवाय हेल्दी समोसा रेसिपी
साहित्य
गव्हाचे पीठ- कप, 1.5 रवा- 1/2 कप (इच्छेनुसार), मीठ- चवीनुसार, ओवा- 1 टीस्पून, तेल- 1/4 कप
सारणासाठी
तेल- 2 चमचे, हिंग- 1/4 टीस्पून, जिरे- 1 टीस्पून, किसलेले आले- 1 इंच, बारीक चिरलेली हिरवी मिरची- 3, हिरवे वाटाणे- 3 चमचे, हळद- 1 चिमूटभर, उकडलेले मॅश केलेले बटाटे- 3, लाल मिरची पावडर - 2 टीस्पून, मीठ - चवीनुसार, काळे मीठ - 1 टीस्पून, सुकी कैरी पावडर - 1 टीस्पून, जिरे पावडर - 1 टीस्पून, गरम मसाला - 1 टीस्पून, धने पावडर - 2 टीस्पून, चिली सॉस - 1 टीस्पून, टोमॅटो केचप - 1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
हेल्दी समोसे कसे बनवायचे?
कढईत गहू, रवा, ओवा, तेल आणि मीठ घालून पाण्याच्या साहाय्याने घट्ट पीठ मळून घ्या.
वरून थोडं तेल लावून पीठ झाकून ठेवा आणि काही वेळ सेट होण्यासाठी सोडा.
कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, हिंग आणि हिरवी मिरची टाका. आता त्यात वाटाणे टाका.
नंतर त्यात तिखट, धनेपूड, काळे मीठ, मीठ, जिरेपूड, आमचूर पावडर, चिली सॉस, टोमॅटो केचप घाला.
नंतर त्यात उकडलेले, मॅश केलेले बटाटे घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा.
वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला.
आता पिठाचे छोटे गोळे करून लाटून घ्या.
मधूनमधून अर्धवट कापून त्रिकोणी आकार करून त्यात बटाटा-मटार सारण भरा.
आता हे समोसे सोनेरी होईपर्यंत तळा.
हिरवी चटणी, लाल चटणी आणि गरम चहाचा आस्वाद घ्या.
हेही वाचा>>>
Food : पावसाळ्यात हेल्दी अन् लाईट स्नॅक्सचा आस्वाद घ्यायचाय? पालकापासून बनवलेले 'स्टीम्ड स्पिनच नगेट्स' Best!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )