एक्स्प्लोर
मनसेला धक्का, माजी आमदार मंगेश सांगळे भाजपत

मुंबई: काँग्रेसच्या कृष्णा हेगडेंनी काल भाजपध्ये प्रवेश केल्यानंतर आता मनसचे विक्रोळीतील माजी आमदार मंगेश सांगळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईमध्ये आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सांगळे यांनी पक्षप्रवेश केला. मंगेश सांगळे यांच्यासोबत शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका लीना शुक्ला यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यादेखील भाजपमध्ये डेरेदाखल झाल्या. लीना शुक्ला या चांदीवलीमधून नगरसेविका आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजपचं इनकमिंग वाढलं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना मंगेश सांगळे म्हणाले की, 'राज ठाकरे यांनी राजकारणात चेहरा दिला. पण मधल्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या. त्याबाबत बोलणं आता योग्य ठरणार. मी पवित्र उद्देश घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.'
आणखी वाचा























