Swachh Survekshan 2021: स्वछ सर्वेक्षण अभियानात मानवत नगर परिषद देशात 13 वी
Swachh Survekshan 2021: केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रानं देशात दुसरा क्रमांक पटकावलाय.
Swachh Survekshan 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केलंय. देशभरातील शहरामध्ये स्वच्छतेबाबत स्पर्धा झाली. यातच परभणीच्या मानवत नंबर परिषदेने स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कचरामुक्त स्वछ शहर स्पर्धेत देशात 13 वा तर, मराठवाड्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
मानवत नगर परिषदेनं प्रशासकीय इमारतीबरोबरच शहराचा चेहरा मोहराच बदललाय. शहरातील 9 प्रभागातून ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो. त्यापासून विविध 4 प्रकारचे खतं तयार केले जातात. याशिवाय शहरातील प्रत्येक घरात शौचालय दिले आहेत. तसेच सार्वजनिक शौचालय ठिकठिकाणी उभारण्यात आली.
महत्वाचे म्हणजे, ज्या ठिकाणी शहरातील नागरिक कचरा टाकण्या बरोबरच शौचाला जायचे तिथे भव्य उद्यान नगर परिषदेनें उभारली आहेत. शहारत कुठेही कचरा सापडूनही सापडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह सह विविध आकर्षक 3 चौक ही शहराच्या सुंदरतेत भर घालत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र अव्वल
केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने शनिवारी यंदाच्या वर्षी केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे निकाल जाहीर केले. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रानं देशात दुसरा क्रमांक पटकावलाय. केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 92 पुरस्कार पटकावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केलाय. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची मान गौरवानं उंचावली असं म्हणत राज्याचं कौतुक केलंय. सांगली जिल्ह्यातील विटा, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व सासवड नगरपालिकांनी अनुक्रमे पहिले तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी या नगरपालिकांचं विशेष अभिनंदन केलंय. राष्ट्रपतींच्या हस्ते विटा, लोणावळा, सासवड नगरपालिकांचा गौरव होणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-