Malegaon Karkhana Election: माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीला पहिला कल हाती, अजित पवारांच्या पॅनलची आघाडी, मोठ्या यशाची नांदी?
Malegaon Sugar Factory Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला पहिला कल हाती आला असून ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

Malegaon Karkhana Election पुणे : बारामतीच्या राजकारणात महत्वाची भुमिका असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची (Malegaon Karkhana Election) मतमोजणी आज होतेय. अशातच साखर कारखान्याच्या निवडणुकीला पहिला कल हाती आला असून ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांच आणि शेतकरी संघटनांच अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात आहेत. या कारखान्याचे एकोणीस हजारांहुन अधिक मतदार असून 88.48 टक्के मतदान झालय. तर निवडणूक लढणाऱ्या नव्वद उमेदवारांमधुन 21 संचालकांची निवड मतदार आज करणार आहेत.विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: या निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली असून ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर असल्याची ही माहिती आता समोर आली आहे.
चुरशीच्या लढतीत कोणाच्या गळ्यात विजयाची माळ?
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल , शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनेल , चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनेल आणि शेतकरी संघटांचे कष्टकरी शेतकरी पॅनेल अशी चार पॅनेल्स मैदानात आहेत. त्यामुळे या अतिशय चुरशीच्या लढतीत कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणीला आज (24 जून) सकाळी नऊ वाजतापासून सुरूवात झालीय. मात्र या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री स्वतः या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेला आहे. बारामतीतील प्रशासकीय भवनात ही मतमोजणी होत आहे.
अ वर्गाची 88.48 टक्के तर ब प्रवर्गात 99.02 टक्के मतदान
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अ वर्गाची 88.48 टक्के मतदान झाले असून यामध्ये 12 हजार 862 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 4 हजार 434 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 19 हजार 549 पैकी एकूण 17 हजार 296 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. तर ब प्रवर्गात 99.02 टक्के मतदान झाले आहे. 102 मतदारांनीपैकी यामध्ये 99 पुरुष आणि 2 स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























