Malaysia Plane Crash : आकाशात उडणारं विमान अचानक थेट रस्त्यावर, भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू
मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या बाहेरील विमानतळावर गुरुवारी विमान उतरत असतानाच त्याच विमानाची एका मोटार सायकलला (Bike) धडक बसली. ही धडक बसल्याने 10 जण जागीच ठार (Dead) झाल्याची भीषण घटना घडली आहे
Malaysia Plane Crash : आकाशात उडणारं विमान अचानक रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांना धडकलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? पण अशीच एक घटना मलेशियात (Malaysia) घडली आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या (Kuala Lumpur) विमानतळावर गुरुवारी विमान (Flight) उतरत असतानाच त्याच विमानाची एका मोटार सायकलला (Bike) धडक बसली. ही धडक बसल्याने 10 जण जागीच ठार (Dead) झाल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात विमानात असणाऱ्या आठही लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघात झालेल्या विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. या विमानाचा अपघात एलमिना टाऊनशिपजवळ दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडला.
Another video of plane crash of Elmina, #Malaysia. #PlaneCrash #Elmina #elminacrash #malaysiaviral #KualaLumpur #privateplane #viral #ViralVideos #Planecrash
— Ekta Chaubey (@EktaChaubey10) August 17, 2023
Video - @ghaeman pic.twitter.com/cd5VLrfgTH
हे विमान लँडिंगच्या आधी नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर कोसळल्याची माहिती मिळत आहे. सेलांगोरचे पोलीस प्रमुखांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरशी संपर्क तुटला आणि रस्त्यावर चालत्या वाहनाला हे विमान धडकले. या गाड्यांमध्ये एक मोटार सायकल आणि कारचा समावेश होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, या अपघाताप्रसंगी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नव्हती आणि विमानाला लँडिंग करण्याची परवानगी देखील देण्यात आली होती. अपघातानंतर पोलीस आणि बचाव कर्मचाऱ्यांनी शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. हे फ्लाइट लँगकावी (Langkawi) बेटावरून निघाले होते आणि राजधानी क्वालालंपूरजवळील सेलंगोरच्या सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर उतरणार होते.
सीएएएमचे मुख्य कार्यकारी नोराझमान महमूद म्हणाले की, विमानाने दुपारी 2.47 वाजता सुबांग एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरशी पहिला संपर्क साधला आणि दुपारी 2.48 वाजता ते लँडिंगकरता परवानगी देण्यात आली. पुढे ते म्हणाले की, 'दुपारी 2.51 वाजता, सुबांग एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरला अपघाताच्या ठिकाणाहून धूर निघताना दिसला, परंतु दरम्यान विमानातून आपत्कालीन कॉल करण्यात आला नाही.' CAAM ने सांगितले की हे फ्लाइट मलेशियन खाजगी जेट सेवा कंपनी जेट व्हॅलेट Sdn Bhd द्वारे चालवले जात होते. फ्लाइटचे ऑपरेटर, यांनी अपघाताबाबत कोणत्याही तात्काळ टिप्पण्यांना प्रतिसाद दिला नाही. या अपघाताची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका Twitter यूजरने हा अपघाताचा व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केला आहे. ज्यात अपघाताचे भीषण दृश्य पाहायला मिळत आहे. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :