एक्स्प्लोर

जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुजी सुटबुटात

माळशिरस आणि दक्षिण सोलापुरात अनेक शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आज ब्लेझर घालून शाळांमध्ये हजेरी लावल्याचे चित्र पहायला मिळाले.

पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्हा परिषदेत ऐरणीवर आलेल्या ब्लेझर सक्तीच्या आदेशाला बहुतांश गुरुजींनी फटकारले. परंतु माळशिरस आणि दक्षिण सोलापुरात काही ठिकाणी मात्र शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनीही ब्लेझर घालून या निर्णयाचे स्वागत केल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतले गुरुजी सुटाबुटात दिसले. सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी आजपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांना ब्लेझरची सक्ती केल्याने सर्वच शिक्षक संघटनांनी या निर्णयावर बहिष्कार घातला होता. आज दिवाळीच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या त्यामुळे सगळ्यांनाच या ब्लेझरबाबत उत्सुकता होती. शिक्षकांवर दबाव आणण्यासाठी आज जिल्हाभरातील शाळांची तपासणी करण्यासाठी पथके पाठवण्यात आली होती. मात्र या पथकाचा दबाव आज जिल्ह्यातील ८० टक्के शिक्षकांनी झुगारून देत केवळ गणवेश परिधान करुन ब्लेझर शिवाय शाळेत हजेरी लावली. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नास तयार असताना आणि गणवेश घालण्यास सर्वानुमते संमती दिली असताना हा ब्लेझरचा अट्टाहास का असा सवाल शिक्षक संघटनांनी केला होता. मात्र याबाबत भारूड यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने कारवाईला न घाबरता सर्वच शिक्षक संघटना या निर्णयाच्या विरोधात उभ्या ठाकल्याने ब्लेझर सक्तीच्या निर्णयाचे आज तीनतेरा वाजले. परंतु माळशिरस, दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही शाळांनी चांगला प्रतिसाद दिला असून माळशिरस तालुक्यातील तिरावांडी आणि धर्मपुरीच्या शाळेत शिक्षकांसोबत विद्यार्थीही ब्लेझर मध्ये शाळेत आले होते. याबाबत बोलताना माळशिरस तालुक्यातील २५ टक्के शिक्षक ब्लेझर मध्ये आल्याचा दावा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केला आहे. पंढरपुरातील शिक्षकांकडे गणवेश आहेत पण ब्लेझर नसल्याची कबुली शिक्षणाधिकारी सुलभ वाठार यांनी दिली. आता प्रशासनाने ही माहिती संकलित करून ब्लेझरला विरोध करणाऱ्या शिक्षकांवर गंभीर कारवाईचा इशारा यापूर्वीच दिला असल्याने जिल्हा परिषद शिक्षक आणि प्रशासनातील वाद आता टोकाला जाणार हे नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Mumbai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Embed widget