एक्स्प्लोर
पुण्यातील हिंगण्यात तरुणाची निर्घृण हत्या

पुणे : पुण्यातील वारजे परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. काल मध्यरात्री 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. या तरुणाची हत्या वारजे परिसरातील हिंगण्यात करण्यात आली आहे. संदीप लक्ष्मण निंगुले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तसंच त्याच वय 18 ते 20 असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या हत्येप्रकरणी सिंहगड पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग























