नाशिकमध्ये राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी चोपलं
कुणाल फालक असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. राज ठाकरे यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्थमन यांच्या भारत वापसीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.
नाशिक : नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यानी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चप्पलनं चोप दिला आहे.
कुणाल फालक असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. राज ठाकरे यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्थमन यांच्या भारत वापसीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेवर कुणालने फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी कुणालला बेदम चोप दिला आणि उठाबशाही काढायला लावल्या. माफी मागितल्यावर कुणालला सोडून देण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील डॉ. शत्रुघ्न थोरात पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज ठाकरेंविरोधात खालच्या पातळीची कमेंट केल्याबद्दल मनसैनिकांनी डॉक्टरला चोप दिला होता. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान राजकीय बळी असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर या मारहाण झालेल्या डॉक्टरने टीका केली होती.
व्हिडीओ- राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मनसैनिकांचा डॉक्टरला चोप
संबंधित बातमी
अजित डोवालांची कसून चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर पडतील : राज ठाकरे
राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मनसैनिकांनी डॉक्टरला चोपलं
व्हिडीओ- राज ठाकरेंवर टीका करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून शिक्षा | स्पेशल रिपोर्ट | पुणे
व्हिडीओ- मारहाणीचा 'मनसे' पॅटर्न | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा