तरुणांची विकृती, भुताटकी भासवण्याचा प्रयत्न, व्हायरल व्हिडीओमुळं नागरिक भयभीत
जळगावात भुताटकी भासवणाऱ्या एका व्हिडीओमुळं नागरिक भयभीय झाले आहेत. परंतु, हा भुताटकीचा प्रकार नसून काही तरुणांचा खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
![तरुणांची विकृती, भुताटकी भासवण्याचा प्रयत्न, व्हायरल व्हिडीओमुळं नागरिक भयभीत Young people try to pretend to be ghosts citizens are scared due to viral video Incidents in Jalgaon तरुणांची विकृती, भुताटकी भासवण्याचा प्रयत्न, व्हायरल व्हिडीओमुळं नागरिक भयभीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/27/498cf90ec2bd802b022db39c491a460e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : कोणाच्या डोक्यात काय विकृती जन्म घेईल, काही सांगता येत नाही. जळगाव जिल्ह्याच्या तोरणाळा ते देऊळगाव गुजरी दरम्यान, घडलेल्या अशाच एका घटनेनं खळबळ माजली आहे. या घटनेत काही मुलांनी एक व्हिडीओ व्हायरल करत भुताटकीचा प्रकार असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलांनी एका धड नसलेल्या उलट्या पायी चालणाऱ्या महिलेचं चित्रण करुन भुताटकीचा प्रकार असल्याचं पसरवलं आहे. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या क्लिपमुळे गावात भितीचं वातावरण पसरलं आहे.
व्हायरल होणाऱ्या क्लिपमुळे गावांत भितीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे व्हायरल होणारी क्लिप व्हायरल करण्यास पोलिसांनी निर्बंध लावले आहेत. तसेच हा प्रकार घडवून आणणाऱ्या तरुणांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील पाहुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर घटनेची क्लिप सोशल मीडियावर अथवा अन्य ठिकाणी कोणीही वायरल केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील तोरणाळा ते देऊळगाव गुजरी दरम्यान रात्रीच्या सुमारास प्रवास करताना कारमधून मुंडकं नसलेला मुलगा आणि एक उलट्या पायाची स्त्री काळोख्या अंधारात रस्त्यावर चालताना कारमधील प्रवाशांना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून तोरणाळा पाठाड तांडा या गावांतील नागरिकांमध्येही भितीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान विज्ञानाच्या युगात भुताटकी प्रकार शक्यचं नसल्यानं ,हा व्हिडीओ काही तरुणांनी खोडसाळ पणातून बनवला आहे, असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. काही खोडसाळ मुलांनी एकत्र येऊन हा व्हिडीओ बनवला असल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसचे अशा फसव्या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये आणि आपली दैनंदिन कार्य नेहमीप्रमाणे सुरु ठेवावी, असं आवाहन पोलिसांच्या तर्फे गावागावात दवंडी देत केले जात आहे.
दरम्यान, सदर घटनेबाबत जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस ठाण्यात सदर तरुणांच्या विरोधात अदाखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)