एक्स्प्लोर

Nagpur Crime : नागपूर हादरलं! 65 वर्षीय वृद्धेवर बलात्काराची घटना उघडकीस

Nagpur Crime News : राज्याची राजधानी नागपूर बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता एका वृद्धेवरही बलात्कार झाल्याचे समोर आले आहे.

Nagpur Crime News : नेहमीच  कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चेत राहणाऱ्या नागपुरात सामूहिक बलात्काराच्या दोन घटना घडल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे सामुहिक बलात्काराची पहिली घटना 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीसोबत घडली असून सामूहिक बलात्काराची दुसरी घटना 65 वर्षाच्या एका वृद्ध महिलासोबत घडली आहे. या घटनांमुळे राज्याची उपराजधानी हादरली आहे. 

65 वर्षीय वृद्धेवर बलात्कार 

नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत लावा परिसरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धेवर बलात्कार करण्यात आला. या पीडित वृद्धेच्या घरी पहाटेच्या सुमारास दोन अनोळखी आरोपींनी प्रवेश केला. दोघांनी एकट्याच राहणाऱ्या वृद्धेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने गुरुवारी वाडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसर्‍याचा शोध सुरू आहे. या घटनेबद्दल पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती देण्यास पोलीस तयार नाहीत. 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपुरच्या जाफर नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. गुरुवारी पीडितेच्या तक्रारीवर रात्री उशिरा अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात 4 आरोपी असून आतापर्यंत कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणासोबत ओळख झाली होती. रविनगर परिसरातून मंगळवारी तो तरुण त्या तरुणीला बाईकवर जाफर नगर परिसरात घेऊन गेला होता. तिथे एका फ्लॅटमध्ये त्याने अल्पवयीन मुलीला गुंगीचे पदार्थ देऊन तिच्या सोबत बळजबरीने  शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीच्या काही मित्रांनीही तरुणीचे शारीरिक शोषण केले. आरोपींनी रात्रभर त्या तरुणीला गुंगीच्या अवस्थेत त्याच फ्लॅटमध्ये ठेवले होते. दुसऱ्या दिवशी तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी पाठवून दिले. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर तरुणी गप्प होती. मात्र काल तिची तब्येत बिघडल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला डॉक्टरकडे नेले आणि ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात चार तरुणांना आरोपी करत त्यांचा शोध सुरू केला आहे. सध्या चारही आरोपी फरार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंदूर-पुणे महामार्गावर अपघात भीषण अपघात,  इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण गंभीर जखमी
इंदूर-पुणे महामार्गावर अपघात भीषण अपघात,  इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन जण गंभीर जखमी
सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार, भर दिवसाच पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं
सोडचिठ्ठी देण्यास पत्नीचा नकार, भर दिवसाच पतीने पत्नीला संपवलं, धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं
Dhananjay Munde : ...म्हणून भर कार्यक्रमात CM फडणवीसांसमोर धनंजय मुडेंना मंत्री करण्याची मागणी केली; कार्यकर्त्याने 'एबीपी माझा'कडे सांगितलं
...म्हणून भर कार्यक्रमात CM फडणवीसांसमोर धनंजय मुडेंना मंत्री करण्याची मागणी केली; कार्यकर्त्याने 'एबीपी माझा'कडे सांगितलं
Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमाचा थरारक शेवट... दुचाकीवरुन आला, पेट्रोल पंपावर थांबला अन् तरुणीला संपवलं; संभाजीनगरमधील खळबळजनक घटना
प्रेमाचा थरारक शेवट... दुचाकीवरुन आला, पेट्रोल पंपावर थांबला अन् तरुणीला संपवलं; संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Embed widget