एक्स्प्लोर

यवतमाळची नरभक्षक शोधपथकाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद

महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वाघिणीचे मूत्र संकलीत करुन यवतमाळच्या जंगलामध्ये स्प्रेद्वारे फवारण्यात आले होते. मूत्राच्या उग्र गंधाचा पाठलाग करत ही वाघीण आज पहिल्यांदा झुडपाबाहेर आली.

यवतामाळ : यवतमाळमधील नरभक्षक टी वन वाघीण अखेर दृष्टीक्षेपात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या वाघिणीच्या मूत्राचा वापर करुन टी वन वाघिणीला आकर्षित करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचं दिसत आहे. कारण आज ही वाघीण पहिल्यांदाच शोधपथकाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

अनेक प्रयत्नानंतरही वाघीण काही सापडली नव्हती. त्यामुळे महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वाघिणीचे मूत्र संकलीत करुन यवतमाळच्या जंगलामध्ये स्प्रेद्वारे फवारण्यात आलं होतं. त्या मूत्राच्या उग्र गंधाचा पाठलाग करत ही वाघीण आज पहिल्यांदा झुडपाबाहेर आली.

झुडपाबाहेर आलेल्या वाघिणीला शोधपथकाच्या कॅमेऱ्याने तिला टिपलं. त्यामुळे लवकरच या वाघिणीला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक वाघिणीच्या शोधासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. वाघिणीला तिच्या बछड्यांसह जेरबंद करण्यासाठी मध्य प्रदेशच्या कान्हा जंगलातील चार हत्ती आणि चंद्रपूरच्या ताडोबामधून एक हत्ती यवतमाळमध्ये आणण्यात आले होते. मात्र हत्तींच्या चमूची वाघिणीला जेरबंद न करताच घरवापसी करावी लागली होती. कारण, साखळी तोडून पळालेल्या एका हत्तीने एका महिलेचा जीव घेतला होता, तर एका पुरुषाला जखमी केलं होतं.

याशिवाय वाघीण रात्री कुठल्या भागात फिरते, याचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रोन वन विभागाने बोलावले असून त्याद्वारे वाघिणीचा शोध घेतला जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यात टी वन वाघिणीची मोठी दहशत आहे. मागील 2 वर्षात या वाघिणीने 13 शेतकरी, शेतमजूर आणि गुरख्याची शिकार करणाऱ्या वाघिणीने 100 पेक्षा जास्त जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ, शेतकरी वाघिणीच्या भीतीत जगत आहे.

या नरभक्षक टी वन वाघिणीने शेवटचा बळी ऑगस्ट अखेर घेतला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाचा आदेश आला. जेरबंद करण्याचे पूर्ण करुनही शक्य नाहीच झालं, तरच ठार मारण्याच्या पद्धतीचा वन खात्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही उचलून धरला.

महत्त्वाच्या बातम्या

Sudhakar Kohale: गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, निराश झाल्यावर त्यातून बाहेर काढणारे ज्येष्ठ नेते; पण...; नागपूर भाजपातील बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले
नागपुरातील भाजपच्या बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले, म्हणाले, गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, पण....
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Embed widget