Yavatmal : बचत गटांच्या महिलांची रक्कम बँकेच्या रोखपालाने परस्पर केली हडप, यवतमाळमधील घटना
Self Help Group : हा प्रकार घडून आठ महिने झाले तरी बँकेने त्या महिला बचत गटाला अद्याप एक रुपयाही परत केला नाही.
यवतमाळ: महिला बचत गटाने (Self Help Group) बँकेत भरायला दिलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा न करता रोखपालाने परस्पर हडप केल्याची घटना यवतमाळमध्ये (Yavatmal) घडली आहे. यासंदर्भात महिलांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली असून हडपलेले पैसे परत करण्याची मागणी केली आहे
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या रूंझा शाखेमध्ये चार बचत गटाच्या महिलांनी नोव्हेंबर 2021 मध्ये आपल्या खात्यात दीड लाख रूपये खात्यात जमा केले. रोखपाल गणपत आसुटकर याने पोच पावतीही दिली. मात्र ही रक्कम खात्यात जमा न करता रोखपालने परस्पर हडप केल्याचा प्रकार घडकीस आला आहे.
यात महालक्ष्मी बचत गट, अनिता संतोष शिवरकर, सुरेखा गजानन मुल्लेमवार यांचे खाते आहे. यातील महालक्ष्मी बचत गटाच्या खात्यात 2 नोव्हेंबर 2021 ला 48,000 हजार रूपये पावती काढून भरले होते. त्याचप्रमाणे अनिता संतोष शिवरकर यांनी 15 नोव्हेंबर 2021ला रोजी 29,000 हजार रूपये भरले होते. आणि सुरेखा गजानन मुल्लेमवार यांनीसुद्धा याच महिनी बचत खात्यात 49,000 हजार रूपये रोखपालाकडे पावतीच्या सहाय्याने भरले होते. मात्र, बँकेचे रोखपाल यांनी खात्यात पैसे भरलेच नाही.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेने रोखपालाची चौकशी सुरू केली आहे. आता याला जवळपास आठ महिने पूर्ण होत आले आहेत. मात्र, बँकेने पैसे भरणाच्या महिलांना एकही रुपया परत केलेला नाही. बँकेच्या शाखेत जाऊन नियमाप्रमाणे पैसे भरल्यानंतर बँकेने आमचे पैसे वेळेत परत करावेत, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
बचत गटाचा हा व्यवहार असून, हे पैसे शेतातील बी-बियाणे, खते खरेदीकरिता ठेवले होते. आता बँक पैसे देत नसल्याने शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र, त्या अर्जावर अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नसल्याने पैसे परत मिळवून द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली महिलांनी केली आहे.