एक्स्प्लोर

ठाकरेंनी संजय राठोडांना पर्याय शोधला, भाजपच्या संजय देशमुखांनी शिवबंधन बांधले

Uddhav Thackeray : संजय देशमुख यांच्याशिवाय ठाण्यातील संजय घाडीगावकर यांनीही आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

Sanjay Deshmukh Shiv Sena : यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. संजय राठोड आणि भाजपला हा धक्का मानला जातोय.  संजय देशमुखांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे. 

संजय देशमुख यांच्याशिवाय ठाण्यातील संजय घाडीगावकर यांनीही आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मागील काही दिवसांपासून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजकारणामध्ये संबंध नाही असे लोक, तसंच वेगवेगळ्या धर्माचे लोक आमच्या सोबत येत आहेत. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

ठाण्यात जाहीर सभा घ्यायचीच आहे. पोहरदेवीच्या दर्शनाला यायचं आहे, तारीख तुम्ही ठरवा, मी येईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. घाईघाईने निवडणूक आयोगाकडे जाऊन आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. ठीक आहे पण मी माझं नाव आणि चिन्ह घेऊन पुढे जात आहे. जे गेलेत ते स्वतः लढले नाहीत, भाजपला पुढे केलं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

संजय देशमुख यांची राजकीय कारकिर्द -

-1998 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्द सुरू. संजय राठोडांसोबत होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख. 
-मात्र, 1999 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होताय. 
-संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक आहेत. 
-संजय देशमुख हे 1999 आणि 2004 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होतेय. 
-2009 मध्ये मतदारसंघाच्या पूनर्रचनेत दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला होताय. या निवडणुकीत तत्कालिन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नव्या दिग्रसमधून लढत संजय देशमुखांचा पराभव केला होताय. 
-2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मतदान घेतलं होतंय.  

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचं राजकारण 1999 पासून कायम दोन 'संजय'भोवती फिरत आहे. यातील एक 'संजय' म्हणजे 'संजय राठोड'. तर दुसरे 'संजय देशमुख. दोघांचीही कारकिर्द सुरू झाली शिवसेनेतून. दोघंही कधीकाळचे कट्टर मित्र. मात्र, आता एकदम कट्टर 'राजकीय शत्रू'. दिग्रसचे आमदार असलेल्या संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करीत बंडखोरी केली.  संजय देशमुखांनी 1999 ते 2009 असं तब्बल 10 वर्ष दिग्रस मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. विशेष म्हणजे दोन्हीवेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, 2009 मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर संजय देशमुख मतदारसंघाच्या राजकारणात काहीसे 'बॅकफूट'वर आल्याचं चित्र होतं. मात्र, दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget