एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women's Day : गोंदियात महिला राज, महिला अधिकारी चालवतात जिल्ह्याचं प्रशासन
गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला 20 वर्षाचा कालावधी लोटला आहे. या 20 वर्षात पहिल्यांदाच गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदावर आणि पोलीस अधीक्षक पदावर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गोंदिया : पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षांत प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. गोंदियासारख्या आदिवासीबहुल भागातदेखील महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. गोंदियात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, झेडपी अध्यक्ष, जिल्हा सत्र न्यायाधीश आणि एसटी आगार प्रमुख आशी सगळी पदं महिला भूषवत आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याची धुरा महिलांच्याच खांद्यावर आहे, असेच म्हणावे लागेल.
गोंदियात जिल्हाधिकरी म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे तर पोलीस अधीक्षक म्हणून विनिता साहु कार्यरत आहेत. सीमा मडावी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून माधुरी आनंद तर संजना पटले या गोंदियातल्या एसटीच्या आगाराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के अधिकार मिळाले. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. गोंदिया जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला 20 वर्षाचा कालावधी लोटला आहे. या 20 वर्षात पहिल्यांदाच गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदावर आणि पोलीस अधीक्षक पदावर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
भारत
Advertisement