एक्स्प्लोर

बारामतीत जन्मदात्या आईने डोक्यात दगड घालून मुलीला ठार केलं, 14 दिवसात राज्यातली ऑनर किलींगची सातवी घटना

ऋतुजाचा पती नांदवत नसल्याने मुलीची आणि तिच्या आईची घरी रोज वाद होत होते. मुलीने नांदावे यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींबरोबर चर्चाही केली होती.

बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीचा खून केल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. डोक्यात दगड घालून ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19 वर्ष) या मुलीचा आईनेच खून केला. यानंतर आरोपी आई संजीवनी हरीदास बोभाटे स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली. बारामतीच्या प्रगतीनगर भागातील ही घटना आहे. खून झालेल्या मुलीने काही दिवसापूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र यानंतर तिचा पती तिला नांदवत नव्हता. तसंच मयत मुलीने तिच्या पतीविरुद्ध तक्रारही पोलीस स्टेशनला दाखल केली होती. यात त्या पतीवर गुन्हाही दाखल झाला होता. मुलीने नांदावे यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींबरोबर चर्चाही केली होती. मात्र ऋतुजाचा पती नांदवत नसल्याने मुलीची आणि तिच्या आईची घरी रोज वाद होत होते. आज अशाच एका घरगुती कारणाच्या वादातून रागाच्या भरात त्या मुलीच्या आईने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. यानंतर ती स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाली. गेल्या 14 दिवसातील ऑनर किलींगच्या घटना चंद्रपुरात अवैध सावकाराने कर्जदाराच्या मुलासह सुनेला पेट्रोल टाकून पेटवले :  कर्जानं दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकारानं कर्जदाराच्या मुलाला आणि सुनेला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना आज चंद्रपुरात घडली प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाची हत्या, आई गजाआड : अनैतिक संबधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाची महिलेने प्रियकराच्या साथीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दहा वर्षांच्या चिमुरड्याला कॅनॉलमध्ये ढकलून आरोपींनी त्याचा जीव घेतला. प्रियकराच्या मदतीने भावी पत्नीकडूनच नवरदेवाचा खून, भंडाऱ्यातील हत्येचा उलगडा : भंडाऱ्यातील एका तरुणाची लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या करुन त्याचा मृतदेह जंगलात फेकला होता. या हत्येचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 48 तासात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह : नागपुरात अवघ्या दोन दिवसांत तीन हत्या झाल्याचं समोर आलं आहे. नागपुरात गुन्हेगारांच्या टोळ्यांमधीस संघर्षात प्रतिस्पर्धी गुंडांची हत्या झाली आहे. अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेटवलं : अहमदनगरमध्ये 'सैराट' चित्रपटातील कथेची पुनरावृत्ती झाली आहे. आंतरजातीय विवाह केल्याने, मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अहमदनगर कथित ऑनर किलिंग घटनेला नवे वळण, मुलीला घरच्यांनी जाळलं नसल्याचं निष्पन्न : अहमदनगरमधील पारनेरच्या निघोजमध्ये घडलेल्या कथित ऑनर किलिंग प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगळाच दाव करुन लोकांना गोंधळात टाकले आहे. अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू, अत्याचार करुन खून झाल्याचा संशय : एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूरातील नागभीड तालुक्यातील पारडी (ठवरे) गावात घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. संबधित बातम्या  अंत्यविधीदरम्यान मानवंदना देण्यासाठी झाडलेल्या गोळीने वृद्धाचा मृत्यू घरगुती वादातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विवाहितेने स्वतःला पेटवून घेतले, डॉक्टर पती भाजला
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकीचा रोष, कुणाचा दोष; ई केवायसीमुळे किती नाव कपात झाली? Special Report
Anjali Bharati On Amruta Fadnavis: प्रसिद्धीसाठी किती खालची पातळी गाठणार? Special Report
Chandrapur Mahapalika : चंद्रपुरात सत्ता? ठाकरेंकडे पत्ता; ठाकरेंची शिवसेना किंगमेकर Speicial Report
Jitendra Awhad Vs Sahar Sheikh : कैसे हराया VS चॉकलेट लाया; हिरवा, तिरंगा आणि राजकारण Special Report
Zero Hour Full : निवडणुकीनंतर महापौर निवडीची प्रतीक्षा, भाजप काँग्रेसमधील कोणत्या गटाच्या संपर्कात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
परभणीत ना आघाडी ना युती, भाजप सर्वाधिक जागावर लढणार, अजितदादा-शिंदेंचाही जोर कायम
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
अंजली भारतीला अटक करा, तिचे कार्यक्रम उधळून लावू; अमृता फडणवीसांवरील वक्तव्य भोवणार, भाजप आक्रमक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोबाईल शुटींगवरुन वाद, कॉलेजमधील युवकाने दुसऱ्या मित्राला भोसकले; दोघांना अटक
Share Market : शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात चित्र बदललं, सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांची एका दिवसात 3 लाख कोटींची कमाई
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क; संपूर्ण डेटा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
Video: सहर शेख म्हणाल्या, कैसा हराया, मुंब्रा हिरवा करु, आता जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, मुंब्य्रातून रंगही सांगितला!
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
Embed widget