एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात फेसबुक मित्राकडून दागिन्यांच्या हव्यासापोटी महिलेची हत्या
फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखी अनेकदा महागात पडतात. याबाबत अनेक घटना समोर आल्या आहेत. पुण्यात देखील फेसबुकवरुन झालेली मैत्री जावघेणी ठरली आहे.
पुणे : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखी अनेकदा महागात पडतात. याबाबत अनेक घटना समोर आल्या आहेत. पुण्यात देखील फेसबुकवरुन झालेली मैत्री जावघेणी ठरली आहे. फेसबुकवर मित्र बनलेल्या एका महिलेची दागिन्यांच्या हव्यासापोटी हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. हत्या करणाऱ्या आनंद निकम नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. फक्त दोन लाख रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी त्याने ही हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.
31 वर्षांच्या आनंद निकमने चार महिन्यांपूर्वी चाळीस वर्षांच्या राधा अग्रवाल नावाच्या महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. राधा अग्रवाल यांनी ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि दोघांमधील मैत्रीला सुरुवात झाली. पुढं ही मैत्री वाढत गेली आणि दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार आनंद निकम पुण्यातील रेंज हिल्स भागात चहाचा स्टॉल चालवायचा तर राधा अग्रवाल या गृहिणी होत्या. त्यांच्या या मैत्रीची दोघांच्याही घरच्यांना कल्पना नव्हती. पावसाचा आनंद घेण्यासाठी आपण ताम्हिणी घाटात फिरायला जाऊ आणि तिथं फोटो सेशन करु असं आनंद निकमने राधा अग्रवाल यांना सांगितले. फोटो चांगले यावेत यासाठी अंगावर भरपूर दागिणे घालून या, असे आनंदने राधा यांना सांगितलं.
आनंदवर विश्वास ठेवून राधा अग्रवाल त्यासाठी तयार झाल्या. 22 जूनला राधा अग्रवाल यांच्याच स्कूटरवरुन दोघे पुण्यापासून 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटाकडे निघाले. तिथे पोहोचल्यावर आनंदने राधाचे फोटो काढायला सुरुवात केली. वेगळे फोटो काढण्याच्या बहाण्याने राधा अग्रवाल यांचे हात त्याने झाडाला बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली.
यानंतर आनंद निकमने खिशात लपवलेल्या चाकूने राधा अग्रवाल यांचा गळा कापला. राधा अग्रवाल यांच्या अंगावर असलेले सात ते आठ तोळे दागिणे घेऊन आनंदने तिथून पोबारा केला. फक्त दोन लाख रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी आनंद निकमने ही हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
राधा अग्रवाल घरी न आल्याने आणि त्यांचा फोनही बंद लागत असल्याने 25 जूनला त्यांच्या 19 वर्षांच्या त्यांच्या मुलाने त्या हरविल्याची झाल्याची तक्रार मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी राधा अग्रवाल यांच्या कॉल रेकॉर्डची माहिती मिळवून तपास सुरू केला असता त्यांनी शेवटचा फोन आनंद निकमला केल्याच उघड झालं.
पोलिस आनंद निकमचा शोध घेत रेंज हिल्स भागात पोहोचले. पोलिसांनी आनंदकडे चौकशी सुरू करताच तो गांगारला आणि कारण सांगून तिथून पळाला. अखेर पोलिसांनी 11 जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आनंद निकमच्या घराची झडती घेतली असता राधा अग्रवाल यांचा मोबाईल आणि स्कूटर त्याच्या घरी सापडली. तर ताम्हिणी घाटात 12 जुलैला राधा अग्रवाल यांचा मृतदेह आढळला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
ठाणे
भारत
Advertisement