एक्स्प्लोर

जळगावात कोविड रुग्णालयाच्या बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह; निष्काळजीपणा केल्यामुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयाच्या बाथरुममध्ये 82 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निष्काळजीपणा केल्यामुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाच्या बाथरूममध्ये काल (बुधवारी) एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचारी यांना दोषी धरत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभाराचे विविध कारनामे समोर येत आहेत. त्यातील एक गंभीर प्रकार काल (बुधवारी) समोर आला होता. कोविड रुग्णलयातून आठ दिवस बेपत्ता असलेल्या मालती नेहेते या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह कोविड रुग्णालयातील बाथरूममध्ये आढळून आल्याने रुग्णालयातील सावळा गोंधळ पुढे आला होता. या घटनेची राज्यपातळीवर गंभीर दखल घेतली गेली असून या घटनेत उपचारा दरम्यान निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचारी यांच्या विरोधात आता शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या संदर्भात रुग्णालयाचे विशेष वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत कळसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या तारखेला कामावर हजर असणाऱ्यांची नावं निष्पन्न करून त्यांच्या विरोधात आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

काय आहे हे प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील 82 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेला प्रकृती गंभीर झाल्याने एक जून रोजी जळगावच्या शासकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. मात्र 24 तासानंतर ही महिला बेपत्ता झाल्याचं समोर आले होते. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था असताना गेल्या आठवडाभरापासून महिला सापडत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांनी सदर महिला हरवल्याची नोंद शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस तपास सुरु असतानाच कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सात मधील बाथरुम मधून दुर्गंधी येत असल्याच समोर आलं होतं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दरवाजा तोडला असता सदर महिला मृत अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.

पाहा व्हिडीओ : जळगावमध्ये आठ दिवस बेपत्ता कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरुममध्ये सापडला

अतिशय निंदनीय बाब : मंत्री गुलाबराव पाटील

कोविड रुग्णलयातून महिला गायब झाल्याचं कळल्यावर महिला हरवल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तक्रार केल्यानंतर पोलीस प्रशासनाने आणि रुग्णालय प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांची मदत घेऊन बाथरुम मध्ये शोध घ्यायला पाहिजे होता. मात्र दुर्गंधी येईपर्यंत तो होऊ शकला नाही, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. या घटनेच्या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करत आहोत. या घटनेमुळे जनतेचा शासनाच्या रुग्णालयच्या विश्वासहर्तेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होते. आमच्या सारख्या लोक प्रतिनिधीच्या दृष्टीनेही ही अतिशय निंदनीय बाब असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

जळगावात कोविड रुग्णालयाच्या बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget