एक्स्प्लोर

Winter Assembly Session : सीमावाद आणि महापुरूषांच्या अपमानावरून विरोधक आक्रमक, गदारोळानंतर कामकाज स्थगित, जाणून घ्या अधिवेशनात काय घडलं

Winter Assembly Session : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद, महापुरुषांचा अपमान आणि राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात असल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला धारेवर धरलं.

Winter Assembly Session : आजपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. विविध मुद्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, विरोधकांच्या आरोपांना परतवून लावण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमानावरून आणि सीमा प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. लोकायुक्त कायद्याचं विधेयकदेखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. परंतु, सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळात विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. 

Winter Assembly Session : दिवसभरासाठी कामकाज स्थगित

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद, महापुरुषांचा अपमान आणि राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात असल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला धारेवर धरलं. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. तरी देखील विधानसभेत दोन्ही बाजूच्या आमदारांनी गदारोळ केला. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 

Winter Assembly Session : विधानभवनातील शिवसेना कार्यालय दोन्ही गटांमध्ये विभागणी 

अधिवेशनात आज सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गटाला कार्यलय कसे मिळणार. परंतु, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी शिवसेनेच्या कार्यालयाची विभागणी करण्यात आली आहे. दोन्हीही कार्यालये आजूबाजूला असणार आहेत. 

Winter Assembly Session : सुषमा अंधारे यांच्याविरोधात शिंदे गट आक्रमक

 शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार सुषमा अंधारेंच्या विरोधात आक्रमक पवित्र्यात होता. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्व मंत्री आणि आमदारांनी आंदोलन केले. 

Winter Assembly Session : विधीमंडळ अधिवेशनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून देखील सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. 

Winter Assembly Session : महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या पाठिशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केली भूमिका

सीमा प्रश्नाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारकडून या प्रकरणात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र सरकारची भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. याचे तुम्ही स्वागत करायला हवे असेही त्यांनी म्हटले. मागील अडीच वर्षात आधीच्या सरकारने निधी आणि योजना बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरु केल्या असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  

Winter Assembly Session : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे बाळाला घेऊन अधिवेशनात 

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनासाठी उपस्थित राहिल्या. सरोज यानाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांचा अडीच महिन्याचा बाळ प्रशंसक हा त्यांच्या शिवाय राहत नाही. त्यामुळे त्या आपल्या बाळाला घेऊनच आज विधानभवनात पोहोचल्या. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाल्या. 

Winter Assembly Session : विधान भवन परिसरात 'शाई पेन'वर बंदी

यंदा प्रथमच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकी नंतर राज्यभरात हे प्रकरण गाजले होते. या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईच्या पेनवर बंदी घालण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Embed widget