एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नसताना 'करून दाखवले' असे होर्डिंग कशाला; राजू शेट्टींचा सवाल
सरकारच्या कर्जमाफी पासून शेतकरी वंचित राहणार आहे. मात्र हे सरकार समजून घ्यायला तयार नाही,आणि कर्जमाफीमुळे या शेतकरी समाधानी झालं,असे समजत असेल,तर 8 जानेवारीला पुकारण्यात आलेल्या देशव्यापी भारत बंद आंदोलनात शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
सांगली : खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नसताना 'करून दाखवले' अशा होर्डिंग लावल्या कशाला, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्याचा,असेल तर चालू पीक कर्ज माफ करा अशी मागणी शेट्टी यांनी केला आहे. तर सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी 8 जानेवारीच्या देशव्यापी बंद मध्ये सहभागी होऊन, सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावे,असे आवाहन देखील शेट्टी यांनी केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सांगलीमध्ये शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजू शेट्टी बोलत होते. खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी वरून बोलताना सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सरकारकडून दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे. मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा खऱ्या शेतकऱ्यांना होत नाही. जे आता शेतकरी राहिले नाहीत, ज्यांनी शेती सोडली आहे. त्यांना या योजनेचा फायदा होणार, यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना जर फायदा होणार नसेल तर तुम्ही शेतकरी कर्जमाफी केली, म्हणून 'करून दाखवलं' अशा होर्डिंग लावल्या कशाला ? असा टोला शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.
तसेच गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये सर्व पीकं वाया गेले आहेत. राज्यात अतिवृष्टी, अवकाळी, महापूर यामुळे शेतकऱ्यांचे सगळ्यात मोठे नुकसान झाले आहे. एकही शेतकरी या नुकसानीपासून वाचू शकला नाही. सप्टेंबरमध्ये या शेतकऱ्यांनी कर्जे घेतली आहेत ते शेतकरी जून 2020 ला थकबाकीदार होणार आहेत जर सरकारला या शेतकऱ्यांना दिलासा द्याचा असेल तर शेतकऱ्यांची चालू पीक कर्ज माफ केली पाहिजे.
सरकारच्या कर्जमाफी पासून शेतकरी वंचित राहणार आहे. मात्र हे सरकार समजून घ्यायला तयार नाही,आणि कर्जमाफीमुळे या शेतकरी समाधानी झालं,असे समजत असेल,तर 8 जानेवारीला पुकारण्यात आलेल्या देशव्यापी भारत बंद आंदोलनात शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. या देशव्यापी आंदोलनात सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत गाठ शेतकऱ्यांशी आहे, हे दाखवून दिलं पाहिजे असे शेट्टी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement