एक्स्प्लोर
मिरज दंगलीचे जुने व्हिडीओ व्हायरल, व्हॉट्सअॅप अॅडमिनना अटक
कोल्हापूर जिल्ह्यातील 4 व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनचा आणि मिरजेतील एका ग्रुप अॅडमिनचा समावेश आहे.
सांगली : मिरज दंगलीचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्हातील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनना आणि व्हिडीओ शेअर करणाऱ्यांना अटक केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 4 व्हॉटस्अॅप ग्रुपच्या अॅडमिनचा आणि मिरजेतील एका ग्रुप अडमिनचा समावेश आहे. तर हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या कोल्हापूरमधील चार जणांना आणि तासगावच्या एकाला देखील पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईखाली ताब्यात घेतले आहे. यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेऊन ग्रुप अॅडमिनवरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिले होते.
कुणा कुणावर कारवाई?
कोल्हापुरातील हातकणंगलेतून ‘दुष्मनों का आशीर्वाद’ ग्रुपचे अॅडमिन नितीश कुबेर जोग, उमेश धोडीराम जोग, तर करवीरमधून ‘एबीएस तालीम’ ग्रुपचे अॅडमिन विजय बाळासो चौगुले, सौरभ सारंग चौगुले यांना अटक करण्यात आली आहे. सांगलीतील मिरजमधून ‘सीदप दिंडे ग्रुप’चा अॅडमिन संदीप दिंडे याला अटक करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement