एक्स्प्लोर

सीबीआय आणि सीआयडी यांच्यातील फरक काय?

सीबीआयमधील सध्या सुरु असलेला वाद देशपातळीवरील विषय बनला आहे. आपल्या विश्वासार्हतेमुळे लोकप्रिय असलेली ही संस्था सध्या वेगळ्याच संघर्षात अडकली आहे.

मुंबई : देशातील सर्वात मोठी आणि विश्वासू तपास यंत्रणा केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय सध्या एका वेगळ्याच संकटातून जात आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर लगाम लावण्याच्या उद्देशाने अस्तित्त्वात आलेली ही संस्था स्वतःच भ्रष्टाचाराच्या संकटात आहे. सीबीआयने आपल्याच संस्थेतील विशेष संचालकांविरोधात लाच घेतल्याचा एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयमधील हा वाद क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या पदांचा असल्याचं बोललं जातं. त्यामुळे क्रमांक एकचे अधिकारी मुख्य संचालक आलोक वर्मा आणि अस्थाना यांना तपास पूर्ण होईपर्यंत सुट्टीवर पाठवण्यात आलंय. देशपातळीवर सीबीआय आणि राज्य पातळीवर सीआयडी या सर्वात विश्वासू तपास यंत्रणा समजल्या जातात. देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेच्या वादादरम्यान राज्यात काम करणारी सीआयडी आणि सीबीआय यांच्यातील फरक समजून घेणं गरजेचं बनतं. सीबीआय म्हणजे काय? सीबीआय म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही संस्था देशभरात कुठेही घडलेल्या गुन्ह्याची चौकशी करु शकते. 1941 साली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट आणि 1963 ला सीबीआय म्हणून ओळख संपूर्ण देश हे कार्यक्षेत्र आहे. लाचलुचपत विभाग, आर्थिक गुन्हे, धोरणात्मक विभाग, विशेष गुन्हे शाखा, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, प्रशासकीय विभाग हे कार्यक्षेत्र देशपातळीवरील हत्या, भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी गंभीर गुन्ह्यांमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा केंद्र सरकारकडून चौकशीचा आदेश दिला जातो. राज्य सरकारच्या विनंतीवर राज्यातील प्रकरणांचीही चौकशी सीबीआयकडून केली जाऊ शकते. डीएसपीई म्हणजेच दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट 1946 अंतर्गत तपासाचे अधिकार सीबीआय संचालकांची नियुक्ती लोकपाल कायद्यानुसार पंतप्रधान, सरन्यायाधीश किंवा त्यांनी नियुक्त केलेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष नेते यांची समिती करते. सीआयडी म्हणजे काय? सीआयडी म्हणजेच क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट राज्य सरकारच्या अखत्यारितील पोलीस विभागातील ही यंत्रणा राज्यातील गुन्ह्यांचा तपास करते. 1902 साली ब्रिटीश सरकारच्या काळात स्थापना संपूर्ण राज्य हे कार्यक्षेत्र आहे. फिंगर प्रिंट ब्युरो, गुन्हे शाखा आणि सीआयडी, अँटी नार्कोटिक्स सेल, मानव तस्करीविरोधी विभाग या विभागात चौकशीचा अधिकार पोलीस आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील दंगल, हत्या यांसारख्या प्रकरणांची चौकशी केली जाते. राज्य सरकार किंवा हायकोर्ट चौकशीचा आदेश देऊ शकतं. सीआयडीचे प्रमुख हे अतिरिक्त संचालक पदाचे पोलीस अधिकारी असतात. सध्या महाराष्ट्र सीआयडीचे संचालक संजीव कुमार सिंघल आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय

व्हिडीओ

Padma Awards 2026 : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
Padma Award 2026 : 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा, रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर
Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
Embed widget