एक्स्प्लोर
सुभाष देशमुख यांच्या टोलेजंग बंगल्याचं प्रकरण नेमकं काय आहे?
सुभाष देशमुख यांनी आरक्षित जागेवर बांधकाम केल्याचा अहवाल पालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयात सादर केलाय

सोलापूर: राज्याचे सहकारमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख यांचा सोलापुरातील टोलेजंग बंगला बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबाबतचा अहवाल महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. आरक्षित जागेवर बंगला : मनपा आयुक्तांचा अहवाल आयुक्तांनी 26 पानांचा मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. यामध्ये सुभाष देशमुख यांनी आरक्षित जागेवर बांधकाम केल्याचा अहवाल पालिका आयुक्तांनी उच्च न्यायालयात सादर केलाय. या 26 पानी अहवालात सुभाष देशमुखांच्या बांधकामावर आक्षेप नोंदवण्यात आलेत. हा अहवाल देऊन पालिका आयुक्त अविनाश ढाकणे रजेवर गेल्याचं कळतंय. सुभाष देशमुखांचा टोलेजंग बंगला सुभाष देशमुख यांनी दोन एकराच्या जागेत सहकार मंत्री सुभाष देशमुखांचा प्लॉट 22 हजार 243 स्क्वेअर फुटांचा आहे. त्यावर त्यांनी 9425 स्क्वेअर फूट बांधकामाची अधिकृत परवानगी घेतली. पण प्रत्यक्षात तीन पट जास्त बांधकाम झाल्याचा अंदाज आहे. मात्र या बंगल्याखालची जमीन महापालिकेच्या अग्निशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. बंगल्याचं प्रकरण थोडक्यात
- 2 एकर जागेत 22 हजार 243 स्क्वेअर फुटांचा प्लॉट
- मात्र संपूर्ण 2 एकर जमीन फायरब्रिगेडसाठी आरक्षित
- 9425 स्क्वेअर फूट बांधकामाची अधिकृत परवानगी घेतल्याचा दावा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























