एक्स्प्लोर

सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक सुनील दर्शन

मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

FIR Against Google CEO: जानवर,  एक रिश्ता, अंदाज, बरसात, हां मैंने भी प्यार किया है, शकालाका बूम बूम यासारख्या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे मुंबई पोलिसांनी सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या 'एक हसीना थी एक दिवाना था' या चित्रपटाचे कॉपीराईट कोणालाही दिलेले नाहीत. असे असूनही या चित्रपटाची गाणी आणि व्हिडिओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केले आहेत. याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

2017 मधील एक हसीना थी, एक दिवाना था हा चित्रपट मला न विचारता यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. कॉपीराईट पूर्णपणे माझ्याकडे आहे आणि मी या चित्रपटाचे हक्क विकलेले नाहीत, असे असतानाही हा चित्रपट अपलोड करण्यात आला असल्याचे सुनील दर्शन यांनी सांगितले. या चित्रपटाला मिळणाऱ्या हिट्सचा फायदा काही दुसऱ्याच व्यक्ती आणि यूट्यूबला होत आहे. एक निर्माता म्हणून मला त्यातून एक पैसाही मिळत नाही. अशा परिस्थितीत मी गेल्या अनेक महिन्यांपासून यूट्यूब आणि गुगलच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न करत होतो. पण पोलिसांमार्फत थेट तक्रार दाखल करण्यात मी अपयशी ठरलो. त्यामुळे मी सेशन्स कोर्टाचा सहारा घेतला. कोर्टाने पोलिसांना कॉपीराईटच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, सुनील दर्शन यांनी सुंदर पिचाई यांच्यासह गुगल आणि यूट्यूबशी संबंधित आणखी 5 अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. यामध्ये गौतम आनंद, जो गियर, नम्रता राजकुमार, पवन अग्रवाल आणि चैतन्य प्रभू यांचा समावेश आहे. या सर्वांवर कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना जाब देखील विचारण्यात आला आहे. एक हसीना थी, एक दिवाना था याआधीही त्यांनी गुगल आणि यूट्यूबविरोधात तक्रार दाखल केली होती. सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्याचे सुनिल दर्शन यांनी सांगितले.

माझ्या श्री कृष्णा इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत जवळपास 20 चित्रपटांचे कॉपीराईट माझ्याकडे आहेत. पण त्याआधी, एक हसीना थी, एक दिवाना वगळता, माझ्या जवळपास प्रत्येक चित्रपट आणि त्यांची गाणी YouTube वर अपलोड करण्यात आली होती. याप्रकरणी 2011 मध्ये गुगल आणि  यूट्यूबविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण 2019 पर्यंत चालले आणि न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिला. परंतू, 2019 मध्ये Google आणि YouTube ने या निर्णयानंतर चंदीगढ उच्च न्यायालयात अपील केले होते. तिथे हे जुने प्रकरण अजूनही प्रलंबित असल्याचे सुनिल दर्शन यांनी सांगितले.

 

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget