एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Weekly Recap : संप, राजकारण ते महाराष्ट्र केसरी, कसा होता आठवडा? वाचा एका क्लिकवर सविस्तर...

Weekly Recap : चालू आठवड्यात म्हणजे 9 जानेवारी ते 15 जानेवारी यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहे. पाहुयात या आठवड्यात घडलेल्या घटनांचा आढावा.

Weekly Recap : प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेत असतो. या चालू आठवड्यात म्हणजे 9 जानेवारी ते 15 जानेवारी यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी पार पडली. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी 2023 चा सोहळा देखील याच आठवड्यात संपन्न झाला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी. याचबरोबर या आठवड्यात काही  दिग्गजांच्या निधनाच्या घटना घडल्या आहेत. पाहुयात या आठवड्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा....
 
कसा होता हा आठवडा?

9 जानेवारी 2023 

Raigad : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये रायगडमधील धक्कादायक घटना

पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी (Physical Efficiency Test) सुरु आहे. परंतु या मैदानी चाचणी सुरु असतानाच रायगडमधून धक्कादायक बातमी समोर आली. रायगड इथे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आढळली. या तिन्ही उमेदवारांच्या रक्ताचे नमुने मुंबई आणि नवी मुंबई इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत . चाचणीदरम्यान तीन उमेदवारांकडे उत्तजेक द्रव्य असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर या तिघांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे न्यूरोकाइंड गोल्ड इंजेक्शन, पाम ओमेगा व्हीआयटी सिई टॅब्लेटस, औषधी द्रव्याच्या तीन काचेच्या बाटल्या पोलिसांना आढळल्या. 

Dr. Vishwas Mehendale passes away: ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे (Vishwas Mehendale) यांचं 9 जानेवारीला निधन झालं आहे. असून वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही (Maharashtra News) काम केलं आहे. विश्वास मेहंदळे वृत्तनिवेदक, लेखक, अभिनेतेही होते. अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनासोबतच 18 हून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. याव्यतिरिक्त मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जायचे. 
 

Abhijit Katke : पैलवान अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी खिताब

महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके (Abhijit Katke ) याने हिंदकेसरी (kesari)  खिताब पटकावला. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळालाय. अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केलाय. भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिजीने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि तितकीच अभिमानाची बाब आहे.    

10 जानेवारी 2023

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला  

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबात 10 जानेवारीला सुनावणी पार पडली. युक्तीवादानंतर या प्रकणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता पुढच्या महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यात सत्तापेच सुरू झाला. राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण प्रलंबित आहे. 10 जानेवारीला याप्रकरणी सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडली. 


Maharashtra Kesari Pune: महाराष्ट्र केसरीचा पुण्यात थरार! 

10 जानेवारीला पुण्यात दिमाखात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला (Maharashtra kesari 2023) सुरुवात झाली. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत आली. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 45 संघ आणि 900 हून अधिक पैलवान या स्पर्धेत उतरले. यासाठी कुस्ती शौकिनांनी केलेली गर्दी करतील. या स्पर्धेची सुरुवात 1961 साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे.


11 जानेवारी 2023 

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची छापेमारी 


कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यातील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी देखील छापेमारी करण्यात आली. ईडी आणि प्राप्तीकर विभागाने एकत्रित ही कारवाई केली. हसन मुश्रीफ यांच्या मुलींच्या घरावरही छापेमारी करण्यात आली. छापेमारी सुरु असताना हसन मुश्रीफ घरी नव्हते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यांमध्ये खळबळ उडाली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 158 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. 


Johnson & Johnson: जॉन्सन अँड जॉन्सनला दिलासा

जॉन्सन अँड जॉन्सनला (Johnson & Johnson) मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay HC) मोठा दिलासा दिला आहे. कंपनीचं आघाडीचं उत्पादन असलेल्या बेबी पावडरवर (Baby Powder) बंदी घालण्याचा एफडीएचा आदेश हायकोर्टानं रद्द केला आहे. त्यामुळं सप्टेंबरपासून बंद असलेली बेबी पावडरची विक्री पुन्हा सुरू करण्याचा मार्ग कंपनीसाठी मोकळा झाला आहे. मात्र बेबी पावडरच्या ज्या उत्पादन संचावर आक्षेप घेत एफडीएनं ही घातली होती, तो सारा माल कंपनीनं स्वत:हून नष्ट करावा. त्या संचातील पावडरचा एकही डब्बा बाजारात विक्रीसाठी जाणार नाही याची जॉन्सन अँड जॉन्सननं खबरदारी घ्यावी अशी सक्त ताकीद देत हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली आहे.


Prithvi Shaw : पृथ्वी शॉने केला रणजी ट्रॉफी इतिहासातील दुसरा सर्वात मोठा स्कोर 

भारताचा युवा सलीमीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) रणजी ट्रॉफीमध्ये एक धमाकेदार खेळी करत अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. एलायट ग्रुप-बीच्या मुंबई विरुद्ध आसाम सामन्यात त्याने तब्बल 379 धावा केल्या. मुंबईकडून खेळताना त्याने आसामविरुद्ध ही विक्रमी धावसंख्या केली. विशेष म्हणजे रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. पृथ्वी शॉने 382 चेंडू खेळून 379 धावा केल्या. म्हणजेच त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 100 च्या जवळपास होता. या खेळीत त्याने 49 चौकार आणि 4 षटकार मारले. या खेळीमुळे त्याने रणजी ट्रॉफीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी खेळणाऱ्या संजय मांजरेकरचा 32 वर्षे जुना विक्रम मोडला. मांजरेकर यांनी 1991 मध्ये हैदराबादविरुद्ध मुंबईकडून खेळताना 377 धावा केल्या होत्या. 


Jayprakash Chhajed : ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन


नाशिकच्या (Nashik News) राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात एक दुःखद घटना घडली असून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निष्ठवान कार्यकर्ते माजी आमदार आणि इंटर्कचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड (Jayprakash Chaged) यांचे निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन 11 जानेवारीला त्यांचे निधन झाले. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. युवक काँग्रेस पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांनी पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली. तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. 


12 जानेवारी 2023

Nashik MLC Election: सुधीर तांबेऐवजी ऐनवेळी अपक्ष सत्यजीत तांबे मैदानात

नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Padvidhar Election) अखेरच्या क्षणी डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana Patole) यांनी तांबे पिता पुत्रांना चांगलेच धारेवर धरले आहे. बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने महत्वपूर्ण भूमिका घेत दिल्ली हायकमांडकडे कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली आहे.

Sharad Yadav Passed Away: जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

12 जानेवारीला रात्री माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या मुलीनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. पापा नहीं रहे, असं ट्वीट शरद यादव यांच्या मुलीनं केलं आहे. गुरुग्राम येथील फोर्टिंस रुग्णालयात शरद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्यार्थी असताना राजकारणापासून सुरु झालेला शरद यादव यांचा प्रवास राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहचला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शरद यादव यांनी राजकीय प्रवास केला. जेडीयूचे ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत. शरद यादव यांनी सात वेळा खासदार म्हणून काम पाहिलं होतं.
 

13 जानेवारी  2023

Nashik Accident : नाशिकमध्ये बस आणि ट्रकचा अपघात, 10 जणांचा मृत्यू

नाशिकमधील (Nashik NewS) पाथरेजवळ भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना 13 जानेवारीला घडली. या भीषण अपघातात 10 जणांचा  मृत्यू झाला. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी खासगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. 


Pune MPSC Protest : पुण्यात MPSC चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर

एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी (MPSC) 13 जानेवारीला राज्यभर आंदोलन केलं.  युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील आंदोलनात सहभागी झाले होते. पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला होता. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.  यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन सुरु आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थी आंदोलन केले. 

Raja Dixit Sadanand More Resignation :  सदानंद मोरे, राजा दीक्षितांचा राजीनामा 

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित  (Raja Dixit Resignation) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे (Sadanand more Resignation) या दोघांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले होते. पण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी राजा दीक्षित  आणि सदानंद मोरे यांना लिखित स्वरूपात त्यांचे राजीनामे मागे घेण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी राजीनामे मागे घेतले. प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या त्रासामुळे राजा दीक्षित  यांनी विश्वकोश निर्मिती मंडळाचा तर सदानंद मोरे यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी या दोघांची भेट घेतली होती. 

Siddheshwar Yatra Solapur : सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात 

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेला  (Siddheshwar Yatra) 13 जानेवारीला सुरुवात झाली. नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषेक सोहळा पार पडला. या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे. यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक घेत असतात. श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही सोलापूरमध्ये गड्डा यात्रा म्हणून ओळखली जाते. यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे हा अभूतपूर्व सोहळा अनेक भाविकांना याची देही याची डोळा पाहता आला नाही. कोरोनाचे सावट कमी झाल्याने आणि राज्य शासनाने निर्बंध कमी केल्याने यंदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. 

आरआरआरमधील 'नाटू नाटू' गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार

80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा  लॉस अँजेलिस, कॅलिफोर्निया येथील बेव्हरली हिल्टन हॉटेलमध्ये पार पडला आहे. जेरॉड कारमाइकल   यांनी हा सोहळा होस्ट केला होता. अनेक कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. 'आरआरआर' (RRR) या भारताच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला.

14 जानेवारी 2023

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ


केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तब्बल तीनवेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे.  पहिला कॉल शनिवारी सकाळी 11.28 मिनिटांच्या सुमारास आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा जनसंपर्क कार्यालयात पोहोचला होता. त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे.


Pune MPSC Protest : 18 तासानंतर MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे


Pune MPSC Protest : 18 तासानंतर एमपीएसीची तयारी (MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन (Student Protest) स्थगित केलं आहे. पुण्यात (Pune) कालपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर अलका टॉकीज चौकात सुरु असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान, आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम असून पूर्णविराम नाही अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. 


Santokh Singh Chaudhary : काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचं निधन

पंजाबच्या (Punjab) जालंधर येथील काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी (Santokh Singh Choudhary) यांचं निधन झालं आहे. संतोख सिंह यांना शनिवारी भारत जोडो यात्रेदरम्यान  (Bharat Jodo Yatra) ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत फिल्लोर येथे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले असताना अचानक ते जमिनीवर कोसळले, त्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Maharahstra Kesari 2023 Winner : शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी 2023 चा मानकरी

पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीतच तयार झाले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget