एक्स्प्लोर

Weekly Recap : शिवसेना-वंचित युती, प्रजासत्ताक दिन ते नात्याला काळीमा फसणाऱ्या घटना, वाचा कसा होता आठवडा?

Weekly Recap : आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेत असतो. या चालू आठवड्यात म्हणजे 23 जानेवारी ते 28 जानेवारी यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

Weekly Recap : आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेत असतो. या चालू आठवड्यात म्हणजे 23 जानेवारी ते 28 जानेवारी यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या आठवड्यातील महत्वाची राजकीय घडामोड म्हणजे शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी (Shiv Sena-VBA Alliance) यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच दौंड हत्याकांड प्रकरण, 74 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, त्याचबरोबर पंतप्रधान मोदींच्या डॉक्युमेंटरीवरून अभाविप-डाव्यांमध्ये जेएनयूत झालेला राडा अशा विविध घटना या आठवड्यात घडल्या आहेत. पाहुयात या आठवड्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा....

23 जानेवारी 2023

Shiv Sena-VBA Alliance : राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र 

राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 23 जानेवारीला संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंती दिवशी या युतीची घोषणा करण्यात आली.

Corona Vaccination: आता गल्लीबोळात असलेल्या औषध दुकानातूनही लसीकरण शक्य!

कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) एक मोठी बातमी समोर आली आहे. आता गल्ली बोळात असलेल्या औषध दुकानातूनही लसीकरण करून घेता येणार आहे. कोरोना महामारीच्या काळातील वाईट अनुभवातून केंद्र सरकार आणि इंडियन फार्मास्यूटिकल असोसिएशनने (Indian Pharmaceutical Association) औषध विक्रेत्यांच्या औषधी संदर्भातल्या ज्ञानाचा वापर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी करण्याचा ठरवलं आहे. 

24 जानेवारी 2023

Devendra Fadnavis : मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट होतं, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केला. गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे (Sanjay Pandey) यांना देण्यात आलं होतं. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात बोलत होते.

Pune Crime News: एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या 

संशयाचं वेळीच निरसन झालं नाही तर तो किती भयानक रूप धारण करतो हे पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या पवार आणि फुलवरे कुटुंबातील सात जणांच्या हत्याकांडातून समोर आलं आहे. आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूमागे काहीतरी काळंबेरं आहे या संशयातून कल्याण पवार आणि त्याच्या भावांनी त्यांचा चुलतभाऊ असलेल्या मोहन पवारसह त्याच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केली. आरोपींच्या मनातील संशयाची आग इतकी भडकली होती की त्यांनी मोहन पवार यांच्या सात, पाच आणि तीन वर्षांच्या नातवांचीही गय केली नाही. ज्या संशयावरून या हत्या झाल्या तो अपघाती मृत्यू संशयास्पद असल्याचं पोलिसांच्या तपासात अद्याप तरी आढळेलल नाही. हत्या करण्यात आलेले मृतदेह भीमा नदीत सापडले होते. हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील होते. 

IND vs NZ : रोहित-शुभमनची शतकं, पांड्याचंही तुफान अर्धशतक, भारताचा विजय

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. यासह भारताने 3 सामन्यांची वनडे मालिका 3-० अशी जिंकली आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीरांनी द्वीशतकी भागिदारी उभारत दोघांनी शतकं ठोकली आहेत. शुभमन गिलनं 112 आणि रोहित शर्मानं 101 धावा ठोकल्या आहेत. याशिवाय हार्दिक पांड्यानंही तुफानी फटकेबाजी करत 54 धावांची दमदार खेळी केली. भारतानं 50 षटकांत 385 धावा केल्या होत्या. 

25 जानेवारी 2023 

JNU BBC Documentary Screening: मोदींच्या डॉक्युमेंटरीवरून अभाविप-डाव्यांमध्ये जेएनयूत राडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या गुजरात दंगलीवर त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य करणाऱ्या माहितीपटावरून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राडा झाला. भाजप-संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. जेएनयू विद्यार्थी संघाच्या कार्यालयात डॉक्युमेंटरीचे स्क्रिनिंग सुरू असताना अचानकपणे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर दगडफेक झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्यावतीने विद्यार्थी संघाच्या कार्यालयात डॉक्युमेंटरी दाखवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र, स्क्रनिंग दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने वीज पुरवठा खंडित केला असल्याचा आरोप JNU विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयशी घोषने केला आहे. 

Santosh Bangar: आमदार संतोष बांगर यांची प्राचार्याला मारहाण 

कायमच कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली (Hingoli) शहरालगत असल्यास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य (Principal) अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली आहे. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे. 

Coronavirus cases : मुंबईत पहिल्यांदाच शून्य कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईकरांसाठी पॉझिटिव्ह बातमी समोर आली आहे. तब्बल 34 महिन्यानंतर शहरात शून्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 16 मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. दोन वर्षापूर्वी मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांचा स्फोट झाला होता, त्यामुळे राज्याच्या चिंतेत वाढ झाली होती. धारावी, दादर, कुर्ला या गर्दीच्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. पण आज मुंबई शहरात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. मुंबईसाठी पॉझिटिव्ह बातमी आहे.


26 जानेवारी  2023

Happy Republic Day 2023: देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन (Happy Republic Day 2023) उत्साहात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्याचं दर्शन झालं. सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना वंदन करून पंतप्रधान कर्तव्य पथावर दाखल झाले तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसि हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर  झालेल्या शानदार सोहळ्यात भारताच्या सामरिक शक्तीचं दर्शन संपूर्ण जगाला झालंय लष्कर, नौदल, वायूदल. यासोबत निमलष्करीदल, पोलीस, डीआरडीओसारख्या संस्था विविध मंत्रालयांचे राज्यांचे चित्ररथ या माध्यमातून भारताची ताकद आणि सांस्कृतिक वारसा उपस्थितांनी आणि संपूर्ण जगानं पाहिला. कर्तव्यपथावर पहिल्यांदाच इजिप्तच्या सशस्त्र दलाकडून संचलन  करण्यात आले.  कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फताह अल खरासावी यांच्या नेतृत्वात इजिप्शियन सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि मार्चिंग तुकडीने परेडमध्ये सहभागी झाली.  या तुकडीत 144 सैनिक होते. पहिल्यांदाच  इजिप्तच्या नेत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमंत्रित करण्यात आले.  

Jayant Patil : पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी 

23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फार मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते," असं जयंत पाटील म्हणाले आहेत. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण जोरदार तापणार आहे. एबीपी माझाशी बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

iNCOVACC: भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी iNCOVACC लस बाजारात

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने (Bharat Biotech International Limited) विससित केलेल्या इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) या नाकावाटे दिली जाणारी लस आज बाजारात आणली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ही लस वितरित करण्यात आली. इन्कोव्हॅक ही नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे. इंग्रजीमध्ये या लशीला Intra-Nasal Covid Vaccine असं म्हटलं जातं. 

Parbhani Accident : परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघात, एकाचा मृत्यू

दुचाकीवर रील तयार करणं विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं आहे. परभणीमध्ये झेंडावंदनला एकाच गाडीवर जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील तयार करताना अपघात झाला. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.  झेंडावंदनाला जाताना मेला या चित्रपटातील डर है तुझे किस बात का? या गाण्यावर विद्यार्थी रील तयार करत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. 

27 जानेवारी 2023

Nanded : भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनी मुलीला संपवलं

भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनीच मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली आहे. मुलीची हत्या करुन राख उधळून दिल्याची माहिती समोर आली आहे. मैत्रिणीने राज्य महिला आयोगाकडे (Maharashtra state women commission chairman) तक्रार केल्यानं या हत्येची घटना उघडकीस आली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील महीपाल पिंपरी इथं ही घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Mohasin shaikh Murder : मोहसीन शेख हत्या प्रकरण; हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईसह 20 जणांची निर्दोष मुक्तता

2014 साली घडलेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणातील (Murder Case) सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि अन्य 20 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2 जून 2014 ला पुण्यातील हडपसर भागात मोहसीन शेख या आयटी इंजिनीयरची हत्या करण्यात आली होती. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह या संघटनेच्या वीस जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप होता. 

28 जानेवारी 2023

MP Plane Crash : मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 कोसळले, एका पायलटचा करुण अंत

भारतीय वायुसेनेची Indian Air Force (IAF) दोन लढाऊ विमाने सुखोई-30 (Sukhoi-30) आणि मिराज-2000 (Mirage 2000) मध्य प्रदेशातील मुरैना (Morena) जिल्ह्यात शनिवारी सकाळी नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळली. या भीषण अपघातात लढाऊ सुखोई विमानातील दोन पायलट सुदैवाने वाचले, पण मिराजमधील पायलटचा करुण अंत झाला.


PM Kisan Samman Nidhi : शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) म्हणजे बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्प नेमकं काय असणार, नवीन काही घोषणा होणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक आनंदांची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ही मदत आता आठ हजार रुपये होणार असल्याची माहिती मिळत आहे.  

ED : ईडीची कारवाई ,आलिशान गाड्या आणि फ्लॅटसह 166 कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्र आणि कर्नाटकात ईडीने (ED) मोठी छापेमारी केली आहे. आयकर परताव्या संदर्भात केलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पुणे, लोणावळा, खंडाळा, कर्जत तसेच कर्नाटकातील उडुपी येथील जमिनी जप्त केल्या. त्याचप्रमाणे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडीसारख्या आलिशान गाड्या आणि मुंबई, पनवेल येथील फ्लॅट अशी सुमारे 166 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आयकर खात्याचे वरिष्ठ कर सहायक तानाजी मंडल आणि इतरांनी आयकर विभागाकडून बोगस मार्गाने उपलब्ध झालेला 263 कोटी रुपयांचा परतावा वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वळवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget