एक्स्प्लोर

Marathwada Rain Update: मराठवाड्यात 23 जूनला पावसाचे होणार आगमन; प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज

Marathwada Rain Update: मराठवाड्यात 23 जूनला पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे.

Marathwada Rain Update: यंदा पावसाचे (Rain) आगमन उशिरा झाले आहे. त्यामुळे पाऊस कधी पडतो याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे (Farmers) लक्ष लागले आहेत. तर मराठवाड्यातील (Marathwada) बळीराजा देखील पावसाची आस लावून बसला आहे. मात्र पाऊस कधी पडणार याचा काहीच भरोसा नाही. दरम्यान मराठवाड्यात 23 जूनला पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवसांनी मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 23 जूनला मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यात, तर 24 जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी वाऱ्याचा वेग अधिक ताशी 30 ते 40 किमी राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक 

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असणार आहे. तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजूनही मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झालेलं नाही. त्यामुळे अशात शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी, तज्ज्ञ देत आहे.

पेरण्याची घाई करू नका...

जून महिना सुरु होताच अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करतात. यावेळी देखील मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहे. पण असे असलं तरीही पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नयेत असे आवाहन कृषी विभागसह तज्ज्ञ करत आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100  मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी केली पाहिजे. मात्र अनेकदा शेतकरी थोडाफार पाऊस पडला आणि शेती ओली झाली की लगेच लागवड सुरु करतात. मात्र पुढे पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Weather Update: महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाचा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget