एक्स्प्लोर

India Weather Updates: उत्तर भारतात पुन्हा थंडीचा कडाका, तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला

सध्या उत्तर भारतात किमान तापमानात वाढ होत असली तरी सोसाट्याचा वारा वाहत आहे. काही ठिकणी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. तर महाराष्ट्रात देखील उन्हाचा चटका वाढला आहे.

India Weather Updates : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील वातावरणात पुन्हा बदल होत आहे. सध्या उत्तर भारतात किमान तापमानात वाढ होत असली तरी सोसाट्याचा वारा वाहत आहे. तसेच काही ठिकणी पावसानं देखील हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. मागील चार पाच दिवसांपासून दिल्लीतील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा हुडहुडी भरली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिल्ली, बिहार, पंजाबमध्ये जोरदार वारे वाहणार असून, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील उन्हाची चाहूल लागली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने थंडीपासून दिलासा मिळाला आहे.


महाराष्ट्र

महाराष्ट्रात कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान 30 अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. गारठा कमी झाला आहे. पुढच्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, उत्तर मगाराष्ट्रात थंडीचा जोर कयम आहे.


दिल्ली

राजधानी दिल्लीत आज ढगाळ आकाश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजधानीत कमाल तापमान 26 अंश, तर किमान तापमान 13 अंश राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राजस्थान

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव आजपासून राजस्थानमध्ये दिसणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून 24 फेब्रुवारीपर्यंत राज्यात ढगाळ आकाश राहणार असून, पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पूर्व राजस्थानमध्ये 20 ते 30 किमी वेगाने वारे वाहतील. तर पश्चिम राजस्थानमध्ये केवळ 30 ते 40 किमी वेगाने धुळीचे वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर राजस्थानमध्ये पाऊस पडू शकतो.

बिहार

बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आजही ढगाळ वातावरण राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटणासह अनेक शहरांचे कमाल तापमान 26 अंश आहे. तर किमान तापमान 14 अंश राहण्याची अपेक्षा आहे. राज्यात पुढील काही दिवस असेच वातावरण राहणार आहे.

पंजाब

पंजाबमध्ये हवामान स्वच्छ होऊ लागले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज राज्यात ढगाळ वातावरण राहील. आज कमाल तापमान 24 अंश तर किमान तापमान 12 अंश राहण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी 26 फेब्रुवारीला राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार आहे.

जम्मू आणि काश्मीर

जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून हवामान बदलणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये ढगाळ आकाश राहील. यासोबतच काही दिवस अधूनमधून पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. आज जम्मूच्या बहुतांश भागात कमाल तापमान 19 अंश तर किमान तापमान 12 अंश राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, काश्मीरमध्ये कमाल तापमान 0 अंश तर किमान तापमान -4 अंश राहण्याचा अंदाज आहे.

उत्तराखंड

राज्याच्या अनेक भागात उद्यापासून तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 11 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 3 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget