ठाणे, रायगडमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट! कोकणात उष्णतेची लाट, मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पाऊस
Weather Update Today : आज काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra Weather) आज वीकेंडला कुठे उन तर, कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता (Unseasonal Rain Prediction) वर्तवण्यात आली आहे, तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे. राज्यात पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा कायम (Temperature Rise) राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात महाराष्ट्रात (Maharashtra Rail Alert) अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
ठाणे, मुंबईत आज तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच कोकणातही आज उन्हाची झळ बसणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात आज तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला आहे. हवामान विभागाने ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील तुरळक भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? पाहा
विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 4, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/IdhEoEXvzi
मुंबईत हवामान कसं असेल?
मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा अजूनही वाढताना दिसत आहे. पहाटे धुके, तर दुपारी उन्हाचा चटका, असे वातावरण सध्या मुंबईत अनुभवायला मिळत आहे. रविवारीही वातावरणात उष्णता कायम राहणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात मुंबईसह उपनगरातील तापमानात वाढ होणार आहे. मुंबईचा पारा 25 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आयएमडीने दिली आहे.
कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 4, 2024
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/ZPUOnXy7LJ
मेचा पहिला आठवडा तापदायक ठरणार
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे एप्रिलप्रमाणे मे महिना नागरिकांसाठी तापदायक ठरणार आहे. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना देखील दिल्या आहेत.