दोन्ही पवार एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले, भाऊ-भाऊ, काका-पुतणे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट : हसन मुश्रीफ
भाऊ भाऊ, काका पुतणे एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे एकत्र येत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे, असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

Hasan Mushrif : आपल्यापेक्षा बुजुर्ग माणसाला खुर्ची देणं आणि पाणी देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा मोठेपणा आहे. दृश्यांमधून त्यांचा मोठेपणा समोर आला असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले. भाऊ भाऊ, काका पुतणे एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे एकत्र येत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यात काहीही वाईट नाही. आम्ही ते एकत्र येण्यासाठी या आधीही प्रयत्न केले असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.
पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर तोडगा काढतील
ज्यांचे जास्त आमदार ही अट असेल तर पालकमंत्री त्या पक्षाचा होतो. पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील अससे मुश्रीफ म्हणाले. अमित शाहसाहेब देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यांच्या संदर्भात चर्चा झाली असेल. अमित शाह यांच्याशी चर्चा झाली आहे की नाही मला माहित नाही पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर तोडगा काढतील असे मुश्रीफ म्हणाले. माणिकराव कोकाटे यांना आज स्थगिती मिळेल. ज्या ज्या केसेस मध्ये अशा शिक्षा झाल्या आहेत. माझ्या आठवणीतील 13 ते 14 केसेस आहेत. राहुल गांधी असतील किंवा सुनील केदार असतील त्यांनाही स्थगिती मिळाली आहे. असे अनेक मंत्री आहेत, त्यामुळं कोकाटेंना देखील आज नक्कीच स्थगिती मिळेल असे मुश्रीफ म्हणाले.
छगन भुजबळ हे आता नाराज नाहीत
छगन भुजबळ हे माझे मित्र नाहीत तर ते माझे नेते आहेत. छगन भुजबळ हे आता नाराज नाहीत, ते पक्षाच्या कामाला लागले आहेत. छगन भुजबळ यांना पुढील काळात मंत्रीपद द्यायचा की नाही हे आमचे पक्षश्रेष्ठी अजित पवार ठरवतील असेही भुजबळ म्हणाले. कोकाटे आणि भुजबळ समर्थकांमधील वादावर देखील मुश्रीफांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, त्या प्रकरणाची मला माहिती नाही, त्यावर अजितदादा योग्य ती दखल घेतील. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज अध्यक्षांच्या सोहळा आहे. विभागाचा मंत्री म्हणून मी आणि राज्यपाल महोदय उपस्थित आहोत. विद्यार्थ्यांसाठी आजचा महत्त्वाचा टप्पा असतो, पदवी प्रदान समारंभाला उपस्थित राहिल्याचा मला आनंद असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार
शिवसेना शिंगे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात देखील मुश्रिफांना विचारण्यात आले. यावेळी मुश्रिफ म्हणाले की, मला त्या प्रकरणाची काहीही माहिती नाही. मी आज मंत्री आहे पण आजपर्यंत कोणालाही पाच पैसे दिले नाहीत असे मुश्रीफ म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देखील मुश्रीफांना विचारण्यात आले, यावेळी ते म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत. पण जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती जरी झाल्या तरी महापौर नगराध्यक्ष हे महायुतीचेच होतील असे मुश्रीफ म्हणाले.
नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 24 वा सभा दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. यासाठी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मंत्री हसन मुश्रीफ, कुलगुरू लेफ्टनंट जनरल( निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर प्रति कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ हे उपस्थित.
महत्वाच्या बातम्या:
























