एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उदयनराजे भाजपमध्ये आले तर आनंदच : चंद्रकांत पाटील
सातारा : उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले तर त्यांचं आनंदच आहे, असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. साताऱ्यातील उंब्रज इथे पाटील बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या टीकेनंतर उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. आदरणीय असलेल्या उदयनराजेंना आम्ही मुजरा करतो. ते जर भाजपमध्ये आले तर आनंदच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या बेधडक विधानासाठी ओळखले जातात. अनेक वेळा त्यांनी पक्षाच्याविरोधातही भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील शेंद्रे इथल्या कार्यक्रमात शरद पवारांनी नाव घेता उदयनराजेंवर टीका केली होती. पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा, असं पवार म्हणाले होते. साताऱ्यातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. माजी आमदार भाऊसाहेब मुणग यांच्या मुलाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अजूनही मोठी रांग आहे, असा दावाही पाटील यांनी केला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर उदयनराजे काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, मतांचं विभाजन टाळण्यासाठी भाजप पश्चिम महाराष्ट्रात समविचारी पक्षांना एकत्र घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
निवडणूक
करमणूक
Advertisement