एक्स्प्लोर
Advertisement
वाशिममध्ये शिवसेना विरुद्ध भाजप निवडणुकीचा हायटेक प्रचार
वाशिम : कुठे एलईडी स्क्रीनवर थेट बाळासाहेब ठाकरेंचा आवाज, कुठे प्रतिकात्मक रोबो, तर कुठे जादूचे प्रयोग... सध्या वाशिम नगरपालिकेच्या नाक्यावर असा हायटेक प्रचाराचा थाट सुरु आहे. रोज संध्याकाळी शहराच्या चौकात एलईडी स्क्रीन घेऊन वाहन उभं राहतं, आणि जमलेल्या ताई, माई अक्कांना मतदान करण्याचं आवाहन केलं जातंय.
शहराच्या चारही बाजूला मोठ-मोठे बलून लावण्यात आले आहेत. शिवसेना आणि भाजपची राज्यात युती झाली असली तरी वाशिममध्ये मात्र दोन्ही पक्ष एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत.
शिवसेना हायटेक प्रचार करते म्हटल्यावर भाजपवाले तरी मागे कसे राहतील. त्यांनी शिवसेनेपेक्षा जास्त उंचीचे बलून अकाशात सोडले आहेत. इतकंच नाही, तर भाजपनं चौका-चौकात गाण्यांची मैफलही आयोजित केली आहे.
आता या हायटेक प्रचारात कोण बाजी मारतं याची उत्सुकता वाशिमकरांना लागली आहे. पण या निवडणुकांमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. शिवाय फुकटची करमणूकही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement