एक्स्प्लोर

Wardha Crime : मोबाईल चोरी करणारी गँग जेरबंद, वर्ध्यात झारखंडची टोळी पकडली

गेल्या काही महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यात मारहाण,चोरी,हत्या,लूटमार यासारख्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे पोलिसांनीही कडक कारवाई करण्याची गरज असल्याचं नागरिकांचं मत आहे.

Wardha Crime : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील (Krushi Utpanna Bajar Samiti) भाजी खरेदी करण्यास गेलेलेल्या दोन व्यक्तींच्या खिशातील मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्यांना वर्धा गुन्हे शोध पथकाने (Wardha Police)अखेर अटक केली असून गुन्हा उघडकीस आणला आहे.  कृषी उत्पन्न बाजार समिती भाजी मार्केट येथे प्रकाश सोनबाजी देवघरे आणि राजेश शामलालजी भारव्दाज दोन्ही रा. गणेश नगर वर्धा हे 24 जुलै रोजी सकाळी भाजी घेण्यासाठी गेले होते, रविवार बाजाराचा दिवस असल्याने मार्केटमध्ये गर्दी होती. प्रकाश देवघरे आणि राजेश भारद्वाज यांचा मोबाईल भाजी घेत असता चोरी गेल्याने त्यांनी लगेच पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली. पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली होती.  

झारखंड राज्यातील तिघांना वर्धा बसस्टॉपवरून अटक 

पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार प्राप्त होताच गुन्हे शोध पथकाचे संजय पंचभाई यांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीवरून आरोपी मोहम्मद अबुल मुर्शीद अन्सारी,  शेख शोएब शेख उम्बर, शेख अफ्रिदी शेख अस्लम (झारखंडचे रहिवाशी) यांना वर्धा शहर बस स्टॉपवरून ताब्यात घेतलं.

गेल्या काही महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ 
 
गेल्या काही महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळतेय. शहरासह जिल्हाभरात मारहाण, चोरी, हत्या, लूटमार यासारख्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे पोलिसांनीही कडक कारवाई करण्याची गरज असल्याचं नागरिकांचं मत आहे. तसेच पोलिस दलाकडून देखील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, गर्दीच्या ठिकाणी जाताना सतर्क राहावे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वर देऊन महिलांचे मंगळसूत्र चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बाजारात खरेदीसाठी गेलेल्या महिलांच्या पर्स पळविणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावर पोलिसांकडून उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Embed widget