Wardha : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Wardha Crime Latest Updates: सततचा अत्याचार सहन न झालेल्या मुलीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या शिक्षिकेला सांगितल्यामुळे हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

Wardha Crime Latest Updates: वर्धा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. नराधम बाप 17 वर्षीय मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली आहे. या संतापजनक घटनेतील नराधम पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हा नराधम बाप मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. शिवाय मुलीवर करत असलेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून नराधम आरोपी हा पत्नीलाही मारहाण करायचा. मात्र, सततचा अत्याचार सहन न झालेल्या मुलीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या शिक्षिकेला सांगितल्यामुळे हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
12 वी मध्ये शिकत असलेल्या या पीडित मुलीने याबाबतची माहिती तिच्या शाळेतील शिक्षिकेला सांगितली. शिक्षिकेने घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ जिल्हा बाल संरक्षण समिती आणि चाईल्ड लाईन केंद्राला याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच अल्लीपूर पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी तत्काळ या प्रकरणात नराधम बापाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल गाडे करत आहेत. मात्र, या घटनेमुळे जिल्ह्याभरात संतापाची लाट उसळली असून नराधम बापाला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार
आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असताना आता ही बातमी समोर आली आहे. पीडित मतिमंद युवती घरी एकटी असल्याचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. हा निंदनीय प्रकार पीडित युवतीच्या भावाच्या लक्षात येताच त्याने आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून 25 वर्षीय आरोपी अतुल सुरेश बोरीवार याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Wardha News : वर्ध्यात मतिमंद युवतीवर अत्याचार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Nashik Crime : अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने लग्न मोडले, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, नाशिकमधील प्रकार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
