एक्स्प्लोर

सहकार, कृषी खातं आपल्याकडे, तुम्हाला कोण उपयोगी पडेल याचा विचार करा, पॅनेल टू पॅनेल मतदान करा : अजित पवार

हकारात सगळ्यांना सोबत घेऊन गेले पाहिजे. आपल्याला अनेक प्रश्न सोडवायचे आहेत.  जातीचा पातीचा विचार करू नका. पॅनेल टू पॅनेल मतदान करा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

Ajit Pawar : सहकारात सगळ्यांना सोबत घेऊन गेले पाहिजे. आपल्याला अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. जातीचा पातीचा विचार करू नका. पॅनेल टू पॅनेल मतदान करा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. आपण चांगला दर दिला आहे. विरोधक चुकीचे सांगून दिशाभूल करत असल्याचे अजित पवार म्हणाले. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवारही उमेदवार

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ब वर्ग संस्था मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे. बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत. तुमच्या समोर हात जोडतोय, कारण तुम्ही मतदार आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी कामाचा माणूस आहे. मी स्वार्थी नाही, मी मतलबी नाही. जेवढं मला भरभरून देता येईल त्यासाठी मी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. अजित पवार चेअरमन होण्यासाठी हे बोर्ड आलं पाहिजे, माझ्यासाठी मतभेद बाजूला ठेवा अशी भावनिक सादही अजित पवारांनी घातली. 

चेअरमनपद दोन कोटी पाच कोटीला विकले जात असल्याचा आरोप केला गेला. मी कामाचा माणूस आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कामे करण्यासाठी मी बारामतीत असतो. सहकार, कृषी, एक्ससाईज खाते आपल्याकडे आहे. तुम्हाला वेळेला कोण उपयोगी पडेल याचा विचार करा असे पवार म्हणाले. कारखान्यात तुम्हाला सभासद केलं पण त्यांनी तुम्हाला विरोध केल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्राचा, राज्याचा डीपीडीसीचा, सीएसआरचा  निधीचा आपल्याला उपयोग होणार आहे. तुमच्या मताला खूप महत्त्व आहे असे अजित पवार म्हणाले. मी आज महाराष्ट्रमधील कारखाने चालवतो. 24 व्या वर्षी मी डायरेक्टर झालो. मुलगा डायरेक्टर आहे. माझं लग्न डायरेक्टर असताना झाल्याचे अजित पवार म्हणाले. आपल्याला सहकाराला ताकद द्यायची आहे. रात्र वैऱ्याची आहे. थापांना बळी पडू नका असे अजित पवार म्हणाले. 22 तारखेपर्यंत मी इथेच आहे. आमचं अधिवेशन 30 जूनला सुरू होणार आहे. हा कारखाना सहकार तत्वावर राहील असेही अजित पवार म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

अजित पवारांना कारखान्यात इंटरेस्ट, 500 कोटीचा कारखाना पाच-पन्नास कोटीत घेतात, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा असली चेहरा वेगळा 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget