एक्स्प्लोर
कंजारभाट समाजात उच्चशिक्षित कुटुंबाकडून वधूची कौमार्य चाचणी
21 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क या भागात लग्न झालं आणि 22 तारखेला हा सगळा प्रकार घडला. यामध्ये वराचे वडील नंदुरबार इथल्या न्यायालयातील निवृत्त अधीक्षक असून वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती कृष्णा इंद्रेकर यांनी दिली आहे.
पुणे : आपण भारताचा 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला, पण या स्वतंत्र देशातल्या कंजारभाट समाजातल्या 'ती'ची मात्र अजूनही लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेतली जाते. पुण्यात कंजारभाट समाजाने पुन्हा दोन नववधूंची कौमार्य चाचणी घेतल्याचा आरोप याच समाजातील कृष्णा इंद्रेकर यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात उच्चशिक्षित वराकडून वधूची कौमार्य चाचणी घेतल्याची घटना घडली होती. हा प्रकारही कृष्णा इंद्रेकर यांनी उघडकीस आणला होता. यावेळी सर्व स्तरातून कंजारभाट समाजावर टीका झाली होती. यावेळी तर चक्क दोन नववधूंची कौमार्य चाचणी घेतल्याची लाजिरवाणी घटना घडल्याचा आरोप केला जात आहे,
21 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क या भागात लग्न झालं आणि 22 तारखेला हा सगळा प्रकार घडला. यामध्ये वराचे वडील नंदुरबार इथल्या न्यायालयातील निवृत्त अधीक्षक असून वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती कृष्णा इंद्रेकर यांनी दिली आहे.
लग्न झालं की त्या रात्री नवा नवरा पांढरीशुभ्र चादर घेऊन खोलीत जातो. बिछान्यावर ही चादर पसरली जाते. शरीरसंबंध झाला की त्या चादरीवर रक्ताचा डाग पडणं सक्तीचं. ते झालं नाही की ती नवी नवरी खोटी. नवरा मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीच्या बाहेर येतो आणि पंच मंडळी निवाड्याला बसलेलीच असतात.
या संदर्भात संबंधित कुटुंबाची बाजू ऐकून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र या घटनेबाबत काहीही बोलण्यास कुटुंबाने नकार दिला, अशी घटना घडली नसल्याचा दावाही कुटुंबाने केला.
राज्य सरकारने जात पंचायतीच्या विरोधात कायदा संमत केला, मात्र तरीही मुलींच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार या समाजात मांडला जात आहे. स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या प्रथेला मूठमाती द्यायला हवी. अर्थात त्यासाठी समाजातील उच्चशिक्षित तरुणांनी पुढं यायला हवं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement