एक्स्प्लोर

VIDEO : व्हायरल सत्य : चिल्लर नाही, भिकाऱ्याकडे नोटांचं बंडल

एखाद्या भिकाऱ्याकडे नोटांची बंडलं सापडणं शक्य नाही... कायम चिल्लरचा खुळखुळा वाजवणारे भिकारी आपण रोजच पाहतो... पण सध्या सोशल मीडियावर एक असा भिकारी व्हायरल झाला आहे.. ज्याच्या विविध खिश्यांमध्ये नोटांच्या थप्प्या आहेत.

उस्मानाबाद : एखाद्या भिकाऱ्याकडे नोटांची बंडलं सापडणं शक्य नाही... कायम चिल्लरचा खुळखुळा वाजवणारे भिकारी आपण रोजच पाहतो... पण सध्या सोशल मीडियावर एक असा भिकारी व्हायरल झाला आहे.. ज्याच्या विविध खिश्यांमध्ये नोटांच्या थप्प्या आहेत. एक कप चहासाठी त्यानं नोटांची बंडलं काढली... त्याच्या खिशातून निघणारी माया कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केली...व्हीडिओ व्हायरल झाला... आणि या व्हीडिओवर कॉमेन्ट्सचा पाऊस पडला.. कळकट्ट मळकट्ट कपडे घालून भणंग फिरणारा हा भिकारी आहे तरी कोण? त्याच्याकडे इतके पैसे आले तरी कुठून? ते खरे तरी आहेत का? बरं नोटा पाच दहा रुपयंच्या नाहीत... तर नोटाबंदीनंतर बदललेल्या 500 आणि 2 हजारांच्याही आहेत.. इतकंच काय दोनशे आणि पन्नासच्या न मिळणाऱ्या नोटांचंही बंडल याच्याकडे आहे. आता या रंकाच्या वेशात कुबेर पाहून चहावालाही चहात साखरेसारखा विरघळला... त्यानं भिकारदास महाराजांना वाकून कुर्निसात केला..महाराजांनी चक्क आशीर्वादही दिला... पण हा भिकारी आहे कुठला... हेच जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडीओचा आणखी बारकाईने अभ्यास केला. त्यावेळी या व्हिडीओतली भाषा ही महाराष्ट्राच्या सीमाभागात बोलली जाणारी वाटत होती. विशेषतः उस्मानाबाद आणि कर्नाटकच्या सीमेवर अशी भाषा बोलली जाते. पण याच व्हिडीओमध्ये एका गावाचं नाव समोर आलं... अलूर.. अलूरचे सर्वात मोठे सावकार... हा या बातमीतला ब्रेक थ्रू होता.. आम्ही सत्यता पडताळण्यासाठी थेट उस्मानाबादच्या लोहारा तालुक्यातल्या अलूरच्या दिशेने रवाना झालो. आणि अखेर त्या व्हिडीओमध्ये व्हायरल झालेला भिकारी आमच्या समोर होता. गुंडाप्पा जिंदल देवकर... वय वर्षे 36...अनेक शहाण्या माणसांना जे वेड लागलंय ना तेच वेड मनोरुग्ण गुंडाप्पाला लागलंय.. पैसे गोळा करण्याचं. पैशांची बंडलं स्वतःजवळ घेऊन फिरण्याचं. आणि त्यांचं लोकांसमोर प्रदर्शन मांडण्याचं.. गुंडाप्पा देवकर गावात अनवाणी फिरतो. गावात पडलेल्या बाटल्या जमा करून विकतो. गावातील लोकांच्या पाया पडून पैसे मागतो. जमलेली चिल्लर दुकानदारांना देऊन त्यांच्याकडून नोटा घेतो. आणि त्याच नोटांची बंडले तयार करतो. गुंडाप्पाची आई यमुनाबाई आणि भाऊ अनिल भाजीपाला विकतात. त्यांनाही गुंडाप्पा पैसे देतो. पण परत देण्याच्या अटीवर. आई - भावालाही माहीत नाही..गुंडाप्पाकडं नेमके किती पैसे आहेत. गावातल्या लोकांना गुंडाप्पा सुट्टे पैसे देतो.. तेही अचूकपणे...ग्रामस्थांना गुंडाप्पाच्या स्मरणशक्तीचे कौतुक आहे. त्या कौतुकापोटी ग्रामस्थांनी दोन आठवड्यापूर्वी हा व्हिडीओ काढला. जो व्हायरल झाला... पैशाचा मोह कुणालाही सुटलेला नाही.. मग तो राजा असो वा रंक.. प्रतिष्ठित असो... वा भणंग.. या पैशाचं वेडच लै भारी. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Embed widget