एक्स्प्लोर
व्हायरल सत्य : मुस्लिम तरुणाच्या हत्येमागील पाक चॅनेलचा कांगावा
दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आणि त्यांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं. जेव्हा नावेदची हत्या करण्यात आली, त्यावेळी बघ्यांची जमलेली गर्दी सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केली. मात्र संपूर्ण घटनेचं स्पष्ट फुटेज हाती लागलं नव्हतं.

अमरावती : पाकिस्तानच्या खोटारड्या न्यूज चॅनेलचा बुरखा 'एबीपी माझा'ने फाडला आहे. बातमी आहे अमरावतीमधल्या एका मुस्लिम तरुणाच्या हत्येची. या घटनेचं भांडवल करत पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलनं तिथल्या नागरिकांच्या मनात भारताबद्दल द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याची संधी साधली. मात्र एबीपी माझानं या प्रकरणातलं सत्य जगासमोर आणून पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलचा भांडाफोड केला आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा अँकर काय म्हणाला? लोग ये कहते है ये तो पाकिस्तान मे नही हुआ, पाकिस्तान का इससे क्या लेना देना.. जिस्म की मानींद है....ये एक ऐसे मुसलमान की कहानी है, जो भारतीय कहने पर खुदको फखर करता था.. इंडिया के लिए उसने बॉडी बिल्डिंग के अंदर उसने टाइटल जिते... पाकिस्तानच्या मेट्रो न्यूज चॅनेलचा अँकर ज्या बॉडी बिल्डरबद्दल बोलत आहे, त्याचं नाव नावेद इकबाल उर्फ पप्पू बॉडीबिल्डर उर्फ मोहम्मद साबीर... वय 28 वर्ष.. नावेद अमरावती शहरातला प्रसिद्ध बॉडीबिल्डर होता. नावेदनं दोनदा विदर्भश्रीचा खिताब पटकावला. 18 जुलैच्या दुपारी पठाणपुरात मशिदीजवळ 5 जणांनी नावेदची हत्या केली. या हत्येनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली. नावेदची हत्या कोणी केली हे जाणून घेण्यापूर्वी पाकिस्तानी चॅनेलने केलेला दावा आश्चर्यकारक आहे. नावेदची हत्या भाजप आणि संघाच्या हिंदू कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप या पाकिस्तानी न्यूज चॅनलने केला आहे. इतकाच कांगावा करुन ते थांबले नाहीत. भारत एक इंतेहा पसंद मुल्क है, इस लेवल पे जाके इंतहा नही करता, लोग उसे मार रहे थे, वो विडियो हम आपको दिखा नही सकते.. सबसे बडी बात ये है की जब उसे मार रहे थे तब दाए बाए से ट्रैफिक अपनी रवानी चल रहा था, कोई रोकनेवाला नही था, लोग ये सोचके की मुसलमान ही मर रहा है, हिंदु ही मार रहे है ना. चले गए वहां से पाकिस्तानी न्यूज चॅनलने केलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी 'एबीपी माझा' अमरावतीत दाखल झाला. अमरावती नागपूरपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मूळच्या अमरावतीच्याच. याच शहरातल्या नागपुरीगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत 18 जुलैला नावेदची हत्या करण्यात आली. असोरिया पेट्रोलपंपासमोर 5 जणांनी तीक्ष्ण हत्यारानं वार करुन नावेदला संपवलं. मोटरसायकलवरुन आलेल्या नावेदला किती क्रूरतेनं मारण्यात आलं, हे रक्ताचा सडा पाहिल्यानंतर वेगळं सांगण्याची गरज नाही. मारेकरी नावेदला फरपटत बँकेपर्यंत घेऊन आले. मात्र त्याला वाचवायला कुणीच पुढे आलं नाही. नावेदच्या हत्येनंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आणि त्यांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं. जेव्हा नावेदची हत्या करण्यात आली, त्यावेळी बघ्यांची जमलेली गर्दी सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केली. मात्र संपूर्ण घटनेचं स्पष्ट फुटेज हाती लागलं नव्हतं. पोलिसांनी अनेक पथकं कामाला लावली आणि 72 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. नावेदची हत्या करणारा दुसरा तिसरा कुणी नसून, त्याचा जवळचा मित्र रहीम खान कादरखान पठाण उर्फ रहीम बॉडीबिल्डरच होता. 33 वर्षांचा रहीम आणि नावेद एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघांनी मिळून जिम सुरु करण्याचं ठरवलं होतं. 2016 मध्ये रहीमनं मिस्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकवलं. यावर्षी होणाऱ्या मिस्टर आशिया स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. नावेदच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला रहीम, त्याचा मित्र मोहसीन खान आणि साजीद खानच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर या हत्येसाठी मदत करणारे झिशान अहमद फारुख, आलीशान उर्फ एतेशाम मोहम्मद फारुख यांना देखील पोलिसांनी अटक केली. त्यामुळे नावेदच्या हत्या प्रकरणात कोणत्याही भाजप किंवा संघाच्या हिंदू कार्यकर्त्याचा हात नाही हे स्पष्ट झालं. पाकिस्तानी न्यूज चॅनेल त्यांच्या नागरिकांच्या मनात भारताविरोधात तिरस्काराचं आणि द्वेषाचं विष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत हे 'एबीपी माझा'च्या पडताळणीत समोर आलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























