एक्स्प्लोर

Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ, जिवाभावाचा सहकारी गमावल्याच्या भावना

विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vinayak Mete : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठा समाजासाठी लढणारा एक नेता हरवल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या  विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. तर विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला व अत्यंत कष्टाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसित केलेला नेता असा विनायकरावांचा परिचय महाराष्ट्राला होता. एका जिवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो असल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केल्या.

भारताला अपघात मुक्त केलं पाहिजे, हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली : नितीन गडकरी

रस्त्यावर अपघात होतात. लोक मृत्युमुखी पडतात. सर्वांनी संवेदनशील नागरिक बनले पाहिजे. या अपघाताचं नेमकं कारण काय हे मला माहीत नाही. मात्र, आपण संपूर्ण भारताला अपघात मुक्त केलं पाहिजे, हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली होईल. विनायक मेटे यांच्या आत्म्याला शांती मिळो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

माझा निकटचा सहकारी गमावला : अजित पवार 

शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायक मेटे यांनी श्रद्धांजली वाहिली. विनायकराव मेटे यांच्या निधनाबद्दल अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाज आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होतं. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळसोबत असलेल ते नेते होते. मला खूप दुःख होत आहे. माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी हिरीरीने भाग घेतलेला आहे. त्यांचे अपघाती निधन महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचे अजित पवार म्हणाले.

मी एक मार्गदर्शक व मित्र गमावले : धनंजय मुंडे 

बीड जिल्ह्यातील धडाडीचे नेतृत्व, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याची व माझी व्यक्तिगत देखील हानी झाली आहे. मी एक मार्गदर्शक व मित्र गमावले असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या. त्यांचे मराठा आरक्षण, शिवस्मारक या प्रश्नासोबतच आमच्या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न यातील योगदान कधीही विसरता येणार नाही. केज तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मेटे साहेबांचा प्रवास पाहून नेहमीच अभिमान वाटायचा. ईश्वर मेटे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सतत चळवळीत काम करणार्‍या नेत्याला महाराष्ट्र मुकला : पंकजा मुंडे

दुर्दैवी अपघातात निधन झाल्याने विनायकराव मेटे यांच्यासारख्या सतत चळवळीत काम करणार्‍या नेत्याला महाराष्ट्र मुकला. कोणत्याही पारिवारिक पार्श्वभुमीविना राजकारणात स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्यच्या जीवावर उभा असणारा मराठा चळवळीतील नेता हरपला आहे अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

मराठा समाजाचे प्रश्न हिरीरीने मांडणारा नेता हरपला : अशोक चव्हाण

माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात मराठा समाजाचे प्रश्न हिरीरीने मांडणारा एक नेता हरपला असल्याच्या भावना काँग्रसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. विधीमंडळात आम्ही अनेक वर्ष सहकारी होतो. त्यांचे अकाली निधन अविश्वसनीय व वेदनादायी आहे. विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायक आणि महाराष्ट्रासाठी नुकसानकारक : सदाभाऊ खोत 

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायक आणि महाराष्ट्रासाठी नुकसानकारक असल्याच्या भावना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केल्या. विधीमंडळातील आमचे सहकारी आणि मराठा समाजाच्या प्रश्नांना ऐरणीवर आणणारे विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा टोला , रोहित पवारांची टीकाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Embed widget