एक्स्प्लोर
सरकार नव्हे, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, विखे पाटलांची टीका

शिर्डी : शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारात राज्यात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असं सांगत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीवर टीका केली. महाराष्ट्र देशात विकासात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा साफ खोटा आहे. हे सरकार नव्हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, अशी आगपाखड विखे पाटलांनी केली. सरकारने दिलेलं एकही आश्वासन आतापर्यंत पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे, अशी टीकाही विखे पाटलांनी केली. भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचं काम शिवसेनेकडून सुरु आहे, असं सांगत शिवसेनेवरही विखे पाटलांनी निशाणा साधला.
आणखी वाचा























