एक्स्प्लोर

Ashok Chavan : अशोक चव्हाणांसोबत तुम्हीही भाजपमध्ये जाणार का? वडेट्टीवार म्हणाले, मी चिल्लर नेता आहे का?

Ashok Chavan Resigns : अशोक चव्हाण यांनी जो अचानक राजीनामा दिलाय त्यामागील कारण अजून स्पष्ट झालं नाही, माझी या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा झाली नाही, त्यांची नाराजी पण कधी दिसली नाही.

नागपूर : अशोक चव्हाण  (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आजी-माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. तुम्हीही भाजपमध्ये जाणार का असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना विचारल्यानंतर त्यांनी आपण काही चिल्लर नेता आहे का? असा प्रतिसवाल विचारला. 

अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता विश्वजीत कदम, अंतापुरकर जवळगावकर, अमित पटेल आणि इतर दोन-तीन मोठे नेते तात्काळ राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मी काही चिल्लर नेता आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार? (Ashok Chavan Resigns)

सकाळी अशोक चव्हाणांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पण पाठवलेला आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडेही राजीनामा पाठवला ही माहिती आता मिळालेली आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची महाराष्ट्राला देशाला ओळख आहे. ते काँग्रेसमध्ये होते आणि अचानक त्यांनी राजीनामा दिला. माझी त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. 

याच्यामागे निराशा किंवा तसे काही असल्याचं दिसत नाही. पक्षा्च्या अनेक बैठकांमध्ये ते सहभागी झाले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते हजर होते. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून तसं काही दिसून आलं नाही. मात्र एक आहे की सातत्याने त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावून त्याना बदनाम करण्याचं काम सुरू होतं. 

त्याही पलीकडे जाऊन शासकीय यंत्रणेचा दबाव होता का? ते नेमकं कशामुळे गेले, ते आज तरी माहिती नाही. मला तर कुठेही नाराजी दिसली नाही. गेले काही वर्षे त्यांच्या बतच आम्ही काम करतो. अशा स्थितीतून अचानक आलेला आजचा राजीनामा धक्का देणारा आहे.

भाजप जितक्या वेळा पक्ष फोडेल, त्याचं नुकसान भाजपलाच होणार आहे. लोकांना हे रुचत नाही वारंवार पक्ष फोडणं, माणसं फोडणं. तुम्ही पक्ष फोडाल तर लोकदेखील तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाहीत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget